अखेर अनिल परबांचा सल्ला नितेश राणेंना ऐकावा लागला!

भाजप आमदार नितेश राणे पोलिसांना शरण.
Nitesh Rane and Anil Parab
Nitesh Rane and Anil Parab Sarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळला मंगळवारी फेटाळला होता. जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याचे संकेत त्यांच्या वकिलांनी दिले होते. यावर शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी वकिली भाषेत उत्तर दिले होते. राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही, असे परब यांनी सांगितले होते.

Nitesh Rane and Anil Parab
आता निलेश राणेंचाही पाय खोलात; पोलिसांकडून गुन्हा दाखल

अनिल परब हे राजकीय नेते आहेत त्याच बरोबत ते वकिलही आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिली बाण्याचा अनुभव अधुनमधुन येत असतो. नितेश राणे यांचा जामिन अर्ज फेटाळ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांच्या वकिलीच्या अनुभवाचा प्रत्येय सगळ्यांनाच आला. ते म्हणाले होते की ''राणेंनी शरणागतीचा अर्ज केलेला नाही. ते शरण येत नाही तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र ठरत नाही. त्यांना अटक होत नाही तोपर्यंत जामीन होत नाही. म्हणून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ते आता उच्च न्यायालयात जाणार असले तरी आधी त्यांना शरण जावे लागेल त्यानंतर आज नितेश राणे पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यामुळे अनिल परब यांनी जे सांगितले होते ते खरे झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नितेश यांची अटक टाळण्यासाठी राणे कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यांनी सुरुवातीला सिंधुदुर्ग न्यायालयात, त्यानंतर उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. या सगळ्या ठिकाणी त्यांनी जामीन मिळाली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानुसार त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी जामीनासाठी अर्ज केला. तो जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर आज राणे पोलिसांसमोर हजर झाले आहे.

Nitesh Rane and Anil Parab
'समय बलवान होता है' : अमित शहांचा तो फोटो दाखवत राणेंनी दिला शिवसेनेला इशारा

दरम्यान, न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. जामीन फेटाळला गेल्यानंतर राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली होती. यानंतर नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांना गाडी अडवण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. मला कायदा शिकवू नका, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली. त्यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने तणाव निर्माण झाला होता. (Nitesh Rane bail hearing)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com