Prakash Solanke, Ramesh Adaskar Sarkarnama
मराठवाडा

Beed News: शेजूळ हल्ल्याप्रकरणी राजकारण करणे आमदार सोळंकेंना शोभत नाही; आडसकरांनी सुनावले

Prakash Solanke: आडसकरांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल झाल्याचा आरोप आमदार सोळंकेंनी केला

सरकारनामा ब्युरो

Majalgaon News: धुलिवंदनाच्या दिवशी अशोक शेजूळ यांच्यावर हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ला प्रकरणाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी विषयांतर करुन राजकारण करू नये, तर माणुसकी म्हणून या हल्याच्या विरोधात लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार सोळंकेंना भाजपचे नेते रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांनी सुनावले आहे.

रमेश आडसकर यांनी निवासस्थानी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, "गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विधानसभेच्या माजलगाव (Majalgaon) मतदारसंघामध्ये कार्यरत आहे. या कालावधीमध्ये एकाही सामान्य माणसाच्या भावना दुखावण्याचे काम आपल्याकडून झाले नाही."

यानंतर आडसकरांनी आमदार सोळंकेंच्या वक्तव्याच्या समाचार घेतला. ते म्हणाले, "अशोक शेजूळ (Ashok Shejul) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असताना मतदारसंघाचे आमदार म्हणून सोळंके यांनी शेजूळ यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली नाही. मारहाण करणाऱ्या आरोपीविषयी तपासाबाबत पोलिसांना निर्देश दिले नाहीत. याउलट रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांच्या सांगण्यावरून आमच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे आरोप करीत आहेत. या हल्ल्याप्रकरणी राजकारण करणे आमदारांना शोभत नाही."

आडसकर यांनी शेजूळ हल्ल्याप्रकरणात कसलाही संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "वास्तविक पाहता अशोक शेजूळ यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke), त्यांच्या पत्नी मंगला सोळंके व रामेश्वर टवाणी यांचे नाव आहे. तसेच शेजूळ यांच्या फिर्यादीतही ही नावे आहेत. शेजूळ यांनी दिलेल्या फिर्यादीचा व आपला कसलाही संबंध नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT