Mp Pritam Munde Reaction On Women players News
Mp Pritam Munde Reaction On Women players News Sarkarnama
मराठवाडा

Pritam Munde On Women Players: महिला खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कुणी न जाणे हे खेदजनक..

विनोद जिरे

Beed News : लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. (Mp Pritam Munde Reaction On Women players) या आंदोलनाची अजूनही केंद्र सरकारनं दखल घेतलेली नाही. गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीत हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. दरम्यान सरकारकडून कुणीही या खेळांडूशी संवाद साधला नाही. भाजपच्या बीडच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी यावर भाष्य करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

महिला खेळांडूशी सरकारकडून कुणीही संवाद न साधने हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी व्यक्त केली आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी मांडली. (Beed) बीड येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. केवळ खासदार म्हणून नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे.

असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते. (Bjp) सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही, ते व्हायला हवे होते. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी, असेही मुंडे म्हणाल्या.

देशभरात गाजत असलेल्या या प्रकरणावर देशातील भाजपच्या एकाही खासदाराने जाहीरपणे यावर अद्याप भाष्य केले नव्हते. प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. या शिवाय केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपये मदतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

६ हजार रुपये देणे हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही. आज पिकांची, शेतीची जी दुरावस्था झाली आहे ती मनुष्य निर्मित नाही, तर निसर्गनिर्मित आहे. या आपत्तीमुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होतो. त्यामुळे शेतीमालाचे भाव घसरतात, यात दोष फक्त केंद्र सरकारचा नाही. जे शेतकरी थकलेले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. फक्त शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी आम्ही काम केले. परंतु सन्मान व्हावा म्हणून ६ हजार घ्या आणि गपचूप बसा असा त्याचा अर्थ होत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT