औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षापुर्वी अच्छे दिनची घोषणा केली होती. ते अच्छे दिन तुमच्या येण्यामुळे औरंगाबाद आणि मराठवाड्यातील रेल्वे येतील, अशी अपेक्षा आहे. पण `बहोत देर कर दी हुजूर आते आते`, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लगावला.
(Aurangabad) औरंगाबाद येथे रेल्वे पीटलाइन व रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आला. (Railway) या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणातून रखडलेल्या रेल्वे विकासावर प्रकाशझोत टाकला. तो टाकत असतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अच्छे दिनची आठवणही रेल्वे मंत्र्यांना करून दिली.
इम्तियाज जलील म्हणाले, मराठवाड्याचा रेल्वे विकास गेल्या कित्येक वर्षापासून ठप्प आहे, साध्या साध्या गोष्टींसाठी देखील आम्हाला भांडावे लागते. प्रत्येकवेळी तुमच्या विभागाकडून रेल्वेला फायदा होत नाही असे कारण रेल्वेकडून दिले जाते. रेल्वे मंत्र्यांना हा निकष थोडा बाजूला ठेवला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मराठवाडा रेल्वेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित महसूल मिळणार नाही.
रेल्वेचे मजबुत नेटवर्क नसल्याने मराठवाड्याचा विकास झालेला नाही. या भागात अजिंठा-वेरुळ सारख्या जगप्रसिध्द लेण्या आहेत. त्या पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक इथे येत असतात. पण इथून देशाच्या इतर पर्यटन क्षेत्राला जोडणारे रेल्वेचे जाळे नसल्यामुळे अडचणी येतात. रेल्वे सोबतच या भागात आयटी क्षेत्राचा विकास झाला तर आम्हाला त्याचा फायदा निश्चित होणार आहे.
पर्यटन क्षेत्राला त्यामुळे चालना मिळेल, तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. अर्थ राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री सोबत आहेत, आम्ही विकासकामासाठी राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी उभे राहू. परंतु आम्हाला रेट आॅफ रिटर्न मिळत नाही, असे सांगितले जाते. मागास क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय ते होणार नाही. आता इथे रेल्वे विकास करा, फायदा-तोटा विसरून मदत करा, अशी मागणी देखील इम्तियाज यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.