Arjun Khotkar NEWS Sarkarnama
मराठवाडा

Jalna News: अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर गोळीबार; जालना शहरात खळबळ...

Mangesh Mahale

Jalana News: शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यावर जालना येथे गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. आज (सोमवार) दुपारी जालना शहरातील मंठा चौफुली येथे हा प्रकार घडला.

अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गजानन तौर यांच्यावर गोळीबार झाला आहे. तौर यांच्या चारचाकी गाडीचा पाठलाग करून दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या गजानन तौर यांना लागल्या असून दोन गोळ्या त्यांच्या जवळून गेल्या.

यात ते जखमी झाले आहेत. या घटनेने जालना शहरात खळबळ उडाली आहे. तौर यांना उपचारसाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

जालना येथील खोतकरांचा कार्यकर्ता गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते. अचानक पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT