Dheeraj Sahu News: धीरज साहू काँग्रेसचे ATM; गांधी परिवारावर भाजपचा हल्लाबोल

Congress Vs BJP: भ्रष्टाचारावर गांधी परिवार गप्प का?
Dheeraj Sahu News
Dheeraj Sahu News Sarkarnama
Published on
Updated on

काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशोबी रक्कमेवरून भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार एकाच नाण्याच्या दोन बाजू असून काँग्रेस पक्षच भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण केंद्र असल्याची जहरी टिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे. काँग्रेस खासदाराने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सोमवारी भाजपच्यावतीने संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भाजप अध्यक्ष नड्डा यांनी भ्रष्टाचारावर गांधी परिवार गप्प का? असा सवाल करत जोरदार हल्लाबोल केला.

काय आहे प्रकरण?

धीरज साहू यांच्या ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील मालमत्तांवर आयकर विभागाने पाच दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. या कारवाईत आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेचे घबाड सापडले होते. त्या रक्कमेची अद्याप मोजणी सुरू असून आत्तापर्यंत 176 बॅगांमधील पैशाची मोजणी पूर्ण झाली आहे.

या कारवाईमध्ये आयकर विभागाकडून 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून अद्यापही धीरज साहू यांच्याशी संबंधित मालमत्तेचे सर्वेक्षण सुरूच असून कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बेहिशोबी रक्कमेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच या कारवाईनंतर राहूल गांधी यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही त्यावरून भाजप अध्यक्ष नड्डा यांनी गांधी परिवारावर जोरदार निशाणा साधला.

Dheeraj Sahu News
Winter Session : कांदा निर्यात बंदीवरून विरोधक आक्रमक; गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन

साहू म्हणजे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक

नड्डा म्हणाले, "आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की, काँग्रेस आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.ते भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारासाठी प्रसिद्ध आहेत, आणि मुळात काँग्रेसचे धोरणच भ्रष्टाचार आहे. त्याचे उदाहरण म्हणजे काँग्रेस खासदार धीरज साहू आहेत. त्यांच्या घरातून कपाटे आणि बॅगा भरून मिळालेला पैसा आहे, त्याची सध्या मोजणी सुरू असून ही मोजणी कुठे थांबेल हे माहीत नाही. तसेच साहू म्हणजे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक असल्याची टीकाही जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर केली. तसेच यापूर्वीच पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडले जाणार नाही, तसेच काँग्रेस हा पक्षच भ्रष्टाचारात बुडालेला आहे. आता काँग्रेस नेते राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांनी गरिबांचा हा पैसा कसा लुटला गेला याचे उत्तर द्यावे, अशी जाब विचारताना भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुगात जावेच लागेल असाही टोला नड्डा यांनी लगावला आहे.

या आंदोलनावेळी राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनीही काँग्रेसवर जोरदार प्रहार केला "धीरज साहू यांच्या घरातून आत्तापर्यंत 354 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. काँग्रेस सांगत आहे, की साहू हे व्यावसायिक आहेत. पण कोणत्या व्यावसायिकाकडे एवढी रोख रक्कम असते, एवढी रक्कम त्यांच्याकडे कुठून आली? असा सवाल करतानाच साहू हे काँग्रेसचे एटीएम आहेत, त्यामुळेच काँग्रेसने त्यांना निलंबितही केले नाही.धीरज साहू दारूच्या धंद्यात असून त्यांनी गरिबांची लूट करून काँग्रेसचे एटीएम बनले आहेत, अशी आरोपही जावडेकर यांनी केला.

सी फॉर काँग्रेस आणि करप्शन

देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट केले जात आहे. एवढेच काय तर सर्वसामान्य जनताही भाजीपाला खरेदी केल्यानंतर डिजिटल पद्धतीने पेमेंट करत आहे. अशा परिस्थितीत एका खासदाराकडे एवढी मोठी रक्कम कशी आली याचे उत्तर काँग्रेसने द्यायला हवे, अशी मागणी भाजपने या आंदोलनावेळी केली आहे.यावेळी भाजप आंदोलकांनी काँग्रेसवर आरोप करणारे विविध फलक हातात घेतले होते. यामध्ये सी फॉर काँग्रेस आणि सी फॉर करप्शन, तसेच काँग्रेस पार्टी म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण केंद्र अशा आशयाचे फलक घेऊन काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

Edited by: Mangesh Mahale

Dheeraj Sahu News
Cricketnama 2023 : ठाकरेंचे वाघ, मनसेची शिकार करणार का? अंबादास दानवेंचा कस लागणार..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com