Jalana News: मनोज जरांगे (Manoj Jarange) दोन दिवसांच्या संवाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर पुन्हा टीका केली. "फडणवीस चुकीच्या जागी भिडले. त्यांनी चिल्लर कामे बंद करावीत. आमच्या मागे 'तुतारी' म्हणणारे फडणवीस काल 'तुतारी' वाजवायला गेले होते. माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा फडणवीसांचा डाव आहे, असे सांगत त्यांनी पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप केले. आता मी दौऱ्यावर निघालो आहे, भाजप कार्यकर्त्यांना मला अडवून दाखवावे. मी घाबरत नाही, असे आव्हान त्यांनी केले.
जुन्या काळात आत्या कान भरवायचं काम करायची, ती भूमिका आता फडणवीस करीत आहेत. त्यांनी पोलिसांचे कान भरून मराठा समाजातील (maratha reservation) तरुणांना खटले दाखल करीत आहेत, बॅनर काढायला लावत आहे, त्यांचा हा डाव फेल जाणार आहे. मी यांच्या या डावापुढे हरणार नाही. आठ नऊ तारखेपर्यंत मजा बघतो मग कामाला लागतो, त्यांनी मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नये. अन्यथा मराठ्यांशी गाठ आहे," असा इशारा जरांगे यांनी फडणवीस यांना दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भुममध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन केले आहे. दौऱ्याआधी जालन्यामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठ्यांना आवाहन करीत मराठ्यांनो खटले दाखल झाले तर त्यासाठी तयार राहा. खुश व्हा. लगेच कोर्टात जाऊन जामीन घ्या. जामीन देण्यासाठी मराठा वकिलांची फौज तयार आहे. मराठ्यावर कसा अन्याय होत आहे. याबाबतचे मेल उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपतींना पाठवा. कोणत्याही नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, नेत्यांसाठी आमचे दारबंद असेल, असे जरांगे यांनी सांगितले.
आमच्या वावरात कसे येतात बघतोच
"माझी भूमिका राजकीय नाही, समाज माझा मालक आहे. बीड जिल्ह्यात 3400 उमेदवारांचे फॉर्म झाले आहेत असं म्हणत घ्या अत्ता डबरीवर बॅलेट पेपर अंथरणार का? आत्ता आमच्या वावरात मतदान केंद्र टाकावे लागणार असे म्हणत कसे आमच्या वावरात येतात बघतो," असा इशारा जरांगे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.