Pune News: शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचे नाव निश्चित झाले आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असेल, याबाबत अद्यापही भिजत घोंगडं आहे. शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (ShivajiRao AdhaRao Patil) यांच्या नावाची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठरवलं, तर आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मनावर घेतलं तर शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याबाबत सूचक विधान आढळरावांनी नुकतेच केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक झाली. बैठकीत पक्ष कुठलाही असो खासदार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करणार आहे, असे एकमत बैठकीत झाले. त्यामुळे शिरूरच्या मैदानात अमोल कोल्हे यांच्या समोर आढळरावांचं आव्हान उभं करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले, माजी आमदार विलास लांडे यांनी शिवाजीराव आढळरावांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारीला थेट विरोध दर्शविला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे विरोधात महायुतीकडून उमेदवारांची अदलाबदल करुन आयात उमेदवार देण्याची चर्चा सुरु असताना अजित पवार गटातील कार्यकर्ते मान्यता देतील कि नाही याबाबत संभ्रम असल्याची भूमिका आहे. यात विलास लांडे यांनी आढळरावांना अप्रत्यपणे विरोध केला आहे.
महायुतीत शिरुरची जागा अजित पवार गटाला जाणार असल्याने कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटीलांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरु असताना विलास लांडे बंड करण्याच्या तयारीत आहे. उमेदवार आयात करणार असाल माझाही विचार करुन निर्णय घ्यावा, असं सुचक विधान त्यांनी केलं आहे.
शिरुरमधुन तीन वेळा इच्छुक होतो, शिरुर मतदार संघावर माझं प्राबल्य असल्याने उमेदवार आयात करण्याची गरज नसल्याचे मतही विलास लांडे व्यक्त केले आहे. त्यामुळे विलास लांडेंनी उमेदवार अदलाबदलीच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या विरोधात विलास लांडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का अशी सध्याची शिरुरची राजकीय परिस्थिती आहे.
आढळरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात असताना खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जुन्या विरोधाची आठवण करुन दिली आहे राष्ट्रवादीच्या विरोधात इतकी वर्षे एकमेकांशी संघर्ष केला, त्यांच्यात आता मनोमिलन होणार का, कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाचा आदर राखला जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित अमोल कोल्हे केले आहेत. 'पद असताना माज नको..! पद गेल्यावर लाज नको' जनता सूज्ञ आहे. पाच वर्षांपूर्वी याच मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवार नाही असे सांगणाऱ्यांनाच आता त्यांच्यासाठीच उमेदवारीसाठी पक्षांतर करावं लागणार, असं सूचक विधान खासदार कोल्हे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.