Maharashtra politics BJP : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरताना महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांवर जोरदार टीका केली.
काँग्रेस संपुष्टात आलीय, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस संपलीय, तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही, असे म्हणत भाजपच्या स्थापना दिनी कार्यकर्त्यांमध्ये रावसाहेब दानवे यांनी जोश भरला.
जालना इथं भाजपच्या (BJP) स्थापना दिनामित्ताने आयोजित मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात रावसाहेब दानवे सहभागी झाले होते. राज्यातील महायुती सरकार मजबूत असल्याचे सांगताना, त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांवर जोरदार टीका केली. पुढच्या निवडणुकीत भाजप संपूर्ण ताकदीने समोरे जाताना दिसेल, असे सांगितले.
रावसाहेब दानवे म्हणाले, "काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीची राज्यात खूप मोठी ताकद होती. परंतु त्यांच्या वागण्यामुळे, व्यवहारामुळे आणि त्यांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे काँग्रेस जवळपास आता संपुष्टात आली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी संपलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही".
जालना जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, एक काळ असा होता शिवसेनेचे तीन आमदार आणि भाजपचा मी एकटा आमदार होतो. मात्र आज काळ असा आहे की, भाजपचे 3 आमदार तर शिवसेनेचे 2 आमदार आहेत, याकडे रावसाहेब दानवे यांनी लक्ष वेधलं. याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं कोणी आहेत का आता? असा सवालही दानवे यांनी कार्यकर्त्यांना विचारला.
वक्फ विधेयक सुधारणा बिलावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी, 'वक्फ विधेयक सुधारणा बिल हा विषय सगळ्यांनी एकदा समजून घेतला पाहिजे. का त्यांचं ऑब्जेक्शन आहे, माहित नाही. एखाद्या बोर्डाने एखाद्या अधिकृत जागेवर ताबा दाखवावा आणि तो खरा ठरवावा. गैर मुस्लिम सदस्य जर, त्या बोर्डात नसेल, सर्व मुस्लिम सदस्य जर त्या वक्फ बोर्डात असतील, तर ऑब्जेक्शन घेण्याचे कारण काय? असा प्रश्न केला'.
'काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याला जर विरोध करत असेल, तर आमच्यासारख्या पुढे प्रश्न पडतो की, बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे आणि आजचे उद्धव ठाकरेंचे शिवसेना कुठे आहे? आता वक्फ विधेयकांतील सुधारणेनुसार नव्याने जी रचना झाली, त्यात कलेक्टरसारखे अधिकारी असणार आहेत', असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.