Narayan Rane Vs Uddhav Thackeray : 'चांगल्या दिवशी नको 'त्या' माणसांचं नाव घेता'; ठाकरेंवर प्रश्न विचारताच खासदार राणे भडकले

BJP MP Narayan Rane Sai Baba Samadhi Shirdi Uddhav Thackeray Maharashtra : भाजप स्थापना दिनानिमित्ताने खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत येत साई समाधीचे दर्शन घेताच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Uddhav Thackeray Vs Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : भाजपच्या स्थापनानिमित्ताने खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत हजेरी लावत साईसमाधीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचं कौतुक करताना, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. याशिवाय वक्फ विधेयक सुधारणा बिलावर देखील भूमिका मांडली.

वक्फ विधेयक सुधारणा विधेयकावर बोलताना खासदार नारायण राणे यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या खासदारांनी संसदेत घेतलेल्या भूमिकेवर माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेत आहात, असे खासदार राणेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पत्रकारांनाच सुनावले.

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी टायमिंग साधलं; प्रभू रामाचं दर्शन घेताच, भाजपला वेगळ्या युद्धाची आठवण करून दिली

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचा विकास , समृद्धी, लोकहिताच्या कामाशी संबंध नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेच काम आहे. यामुळे त्यांचा पक्ष आवळत चाललाय, पुढच्या निवडणुकीत हा पक्ष राहात नाही. विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी 39 वर्ष त्यांच्या सोबत काम केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता, साहेब गेले अन् शिवसेना संपली".

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Manikrao Kokate : शिवसैनिकांनी कोकोटेंचा पुतळा फासावर लटकवला!

'देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चांगल काम करत आहे. विरोधकांकडे दुसरे काम राहिलेले नाही. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू असल्याने समाधान वाटते', असे खासदार नारायण राणे यांनी म्हटले.

वक्फ विधेयक सुधारणा बिलावर बोलताना, विरोधकांचा या कायद्याचा अभ्यास नाही. त्यांनी ते वाचावं. कोणाच्या जाती धर्माविरोधात बिल नाही. वक्फच्या नावाने जो दुरुपयोग चालला होता तो थांबवावा. मुस्लिम समाजात जे गरीब लोक किंवा तलाक झालेल्या महिला आहेत त्यांच पुनर्वसन व्हावं , शिक्षण मिळावं. हा समाज देखील प्रगत समाजाबरोबर जावा. त्यादृष्टीने वक्फ बिल आणलय अन् ते मंजूर झालं आहे, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com