Narayan Kuche convoy vehicle meets with accident Sarkarnama
मराठवाडा

Narayan Kuche Convoy Accident : मोठी बातमी! आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात; तिघांची प्रकृती चिंताजनक

Narayan Kuche convoy vehicle crash in Jalna : जालना येथे आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Rashmi Mane

Three injured in MLA convoy accident: जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. भाजपचे बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, आमदार नारायण कुचे हे आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरकडे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघाले होते. पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या दरम्यान जामखेड फाटा परिसरात ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाचा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती स्वतः आमदार कुचे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

अपघातग्रस्त वाहनात आमदार नारायण कुचे प्रवास करत नव्हते. त्या गाडीत त्यांचे सुरक्षा रक्षक, चालक आणि एक सहकारी उपस्थित होते. अपघात इतका गंभीर होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले. तिघांनाही गंभीर दुखापती झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघात घडला तेव्हा आमदार कुचे यांचे वाहन या गाडीच्या मागेच होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवले आणि मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनाच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना त्वरित जालना शहरातील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

जखमींवर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT