Ram Temple Trust : राम मंदिर ट्रस्टच्या अडचणीत भर? सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका; सार्वजनिक ट्रस्ट, फेररचना अन् फॉरेन्सिक ऑडिटची मागणी

Nirmohi Akhara seeks restructuring of Ram Temple Trust : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची फेररचना, फॉरेन्सिक ऑडिट आणि रामानंदी संप्रदायाला देखरेखीचे अधिकार देण्याची मागणी; 2019 च्या निकालाच्या अंमलबजावणीवरही उपस्थित केले प्रश्न.
Supreme Court petition against Ram Temple Trust
Supreme Court petition against Ram Temple TrustSarkarnama
Published on
Updated on

Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची फेररचना करून त्याला 'सार्वजनिक ट्रस्ट' म्हणून घोषित करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी निर्मोही आखाड्याने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.

या याचिकेमुळे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अडचणीत भर पडली आहे.

निर्मोही आखाड्याचे महंत राजारामचंद्राचार्य अतीत गुरु रघुनाथ दास यांनी दाखल केलेल्या याचिकेत, सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते, याची आठवण करून देण्यात आली आहे.

याचिकेनुसार, सध्याच्या ट्रस्टची रचना ही सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) त्या निकालामागील उद्देश आणि भावनेशी सुसंगत नसून, ट्रस्टची फेररचना करून त्याला सार्वजनिक ट्रस्टचा दर्जा देणे आवश्यक आहे. तसेच, रामानंदी बैरागी संप्रदायातील संतांना विश्वस्त मंडळाच्या निर्णयांवर देखरेख ठेवण्याचे अधिकार देणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Supreme Court petition against Ram Temple Trust
Ram Mandir Trust : अयोध्या राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर, पुढे काय होणार?

याचिकेत पुढे म्हटले आहे की, विश्वस्तांची नियुक्ती करताना केंद्र सरकारने कोणती मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश द्यावेत. तसेच, राम मंदिरातील पूजा, सेवा, भोग आणि इतर धार्मिक विधी हे रामानंदी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीनुसार पार पडावेत. वादग्रस्त जागा अधिग्रहित होण्यापूर्वी निर्मोही आखाडाच या परंपरा पाळत होता, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Supreme Court petition against Ram Temple Trust
Ram Mandir Purification Ritual : राम मंदिरातील देणगी चोरीनंतर ट्रस्टचा मोठा निर्णय; 10 दिवसांचा शुद्धीकरण विधी सुरू

याशिवाय, नोव्हेंबर 2019च्या निकालातील निर्देशांची ट्रस्टने योग्य अंमलबजावणी केली आहे का, याची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. ट्रस्टच्या आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहारांचे न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नियुक्त करण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप सुनावणी घेतलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com