Political tension rises in Jalna Municipal Corporation after Congress group leader backs BJP nominee, leading to loss of nominated member opportunity. Sarkarnama
मराठवाडा

Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेत स्थायी समिती सभापदी पदावर दिग्गजांच्या शर्यतीत अशोक पांगारकरांची सरशी!

Jalna Municipal Corporation standing committee News : सहाही विषय समित्यांवर भाजपचाच बोलबाला असून स्थायी समितीच्या सभापतीपदी अशोक पांगारकरांची वर्णी लागली आहे.

Jagdish Pansare

Jalna News : जालना महानगरपालिकेतील स्थायी समितीसह पाच विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतीपदांसाठी नुकतीच नामनिर्देशन प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, सहाही विषय समित्यांवर भाजपचाच बोलबाला असून स्थायी समितीच्या सभापतीपदी अशोक पांगारकरांची वर्णी लागली आहे. महापालिकेत भाजप बहुमताने सत्तेत असल्यामुळे सगळी महत्वाची पद त्यांच्याच वाट्याला येणार आहेत.

महापौरपद एससी महिलेसाठी राखीव झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे अनेकांच्या नजरा होत्या. कारण या पदासाठी भास्कर दानवे, संगीता गोरंट्याल यासारख्या दिग्गजाची नावे चर्चेत होती. मात्र भाजपकडून पहिल्यांदाच अशोक पांगारकर यांना स्थायी समितीच्या सभापतीपदी संधी देण्यात आली.

दरम्यान, सर्व विषय समित्यांचे सभापती व उपसभापती पदाचे नामनिर्देशन दाखल झाले आहे. भाजपकडून (BJP) स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी कपिल भूरेवाल, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदासाठी पूनम स्वामी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी संध्या देठे, शिक्षण व विद्युत सभापतीपदासाठी भाग्यश्री जोगस, बांधकाम समिती सभापतीपदासाठी माया जोशी यांना संधी देण्यात आली.

विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतींची अधिकृत निवड मंगळवारी ( ता.17) विशेष सभेमध्ये नामनिर्देशन पत्रांची छाननी करून घोषणा केली जाणार आहे. भाजपकडून पाच समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदी नऊ महिलांना संधी देण्यात आली आहे.

पूनम स्वामी, संध्या देठे, भाग्यश्री जोगस, माया जोशी यांच्यासह उपसभापती पद्मा मानधनी (महिला व बालकल्याण),अनामिका पांगारकर (स्वच्छता व आरोग्य), ऐश्वर्या आडेकर ( बांधकाम समिती), कार्तिकी इंगळे (विद्युत समिती), अनिता खोडवे (पाणीपुरवठा व जलनिस्सारण) यांना भाजपने संधी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT