Sanjay Raut: इराण हा भारताचा जुना मित्र आहे, सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत भारतानं इराणशी संवाद केल्यानंतर भारतात दोन तेलवाहू जहाजांना परवानगी देण्यात आली, अशा बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर इराणला भारतानं नैतिक पाठबळ देणं गरजेचं असल्याचं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. हे सांगताना त्यांनी एक महत्वाच विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, दोन्ही देशांमध्ये संवाद झाला आहे असं अजूनतरी इराणकडून अधिकृतपणे सांगितलं जात नाहीए, भारताकडून मात्र तशा अफवा पसरवल्या जात आहेत. खरं म्हणजे इराणशी संवाद होणं गरजेचं आहे. पण इराणशी तुम्ही कोणत्या तोंडान संवाद करणार आहात? ज्या इराणचा सर्वोच्च नेता इस्रायलच्या हल्यात मारला गेला, त्याच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी साधी संवेदना व्यक्त केली नाही. त्या इराणशी तुम्ही कोणत्या तोंडानं बोलणार आहात? खरं म्हणजे आपण इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचं आहे.
युद्ध युद्धाच्या ठिकाणी पण भारतानं एक तटस्थ भूमिका घेऊन इराणच्या दुःखात सहभागी होणं गरजंचं होतं. खास करुन इराणच्या सर्वोच्च नेत्याचं निधन झालं, विशेष म्हणजे २०० हून अधिक कोवळ्या बालिकांचा मृत्यू किंवा हत्या या हल्ल्यात झाली, ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. यासंदर्भात भारताकडून अजूनही शोकसंवेदना व्यक्त करण्यात आलेल्या नाहीत. फक्त हार्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचे टँकर सोडा इथपर्यंत आपला इराणचा संबंध आहे का? नाही. इराणशी आमचे राजनैतिक, वैक्तिगत आणि सांस्कृतीक संबंध प्रस्थापित आहेत. त्यामुळं इराणला नैतिक पाठबळ देणं भारताला गरजेचं आहे, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.