Manoj Jarange Patil On Dhananjay Munde, Maratha activist Manoj Jarange’s delegation submits a memorandum to Jalna SP, accepting Dhananjay Munde’s narco test challenge amid rising political heat. Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange : जालन्यात मोठी घडामोड! धनंजय मुंडेंचं 'ते' आव्हान जरांगेंनी 24 तासांतच परतवून लावलं

Manoj Jarange : धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यातील नार्को टेस्ट वादामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. जरांगे यांनी 24 तासांतच आव्हान स्विकारून पोलिस अधीक्षकांकडे अर्ज सादर केला.

सरकारनामा ब्यूरो

Jalna News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचा धक्कादायक आरोप करत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. एकापाठोपाठच्या मुंडे आणि जरांगे पाटलांच्या पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान देत राजकारणच पेटवलं आहे. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नार्को टेस्टचं आव्हान 24 तासांच्या आतच स्वीकारलं आहे.

जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ शनिवारी (ता. 8 नोव्हेंबर) गेले होते. त्यात अंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुंरंग तारक यांच्यासह जरांगेंचे विश्वासू सहकारी यांचाही समावेश होता. निवेदन देतानाच जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात या शिष्टमंडळानं जरांगेंची नार्को टेस्ट करावी असा अर्ज त्याठिकाणी सादर केला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माझ्या हत्येसाठी अडीच कोटी रूपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर केला आहे. जरांगेंच्या याच आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुंडेंनी त्याचदिवशी परळी येथे पत्रकार घेत मनोज जरांगे यांचे आरोप फेटाळले. तसेच याप्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे CBI चौकशी करण्याची मागणी केली. याचसोबत त्यांनी आपली व मनोज जरांगेंची ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि नार्को टेस्ट करावी अशीही मागणी केली आहे.

याचदरम्यान, आता मनोज जरांगे यांनीही धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर आपणही नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं ठणकावून सांगितलं. त्याच पार्श्वभूमीवर 24 तास उलटायच्या आतच एक पाऊल पुढे टाकत मनोज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच आव्हान स्वीकारत थेट आपली नार्को टेस्ट करावी या मागणीसाठी शिष्टमंडळाला थेट जालना पोलिस अधीक्षकांकडे अर्ज सादर करण्यासाठी पाठवलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळानं जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देषमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यातून विस्तवही जाताना दिसून येत नाही. जरांगेंसह भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले होते. जरांगे आणि धस यांनी संधी मिळताच प्रत्येकवेळी धनंजय मुंडेंवर टोकाची टीका केली होती.

पोलीस प्रशासन या अर्जावर काय निर्णय घेणार?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ शनिवारी(ता.8 नोव्हेंबर) गेले होते.आता पोलिस प्रशासन जरांगेंच्या शिष्टमंडळाच्या अर्जावर नेमका काय निर्णय घेता याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. जरांगेंनी आव्हान स्विकारल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं पुढचं पाऊल काय असणार याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची खरोखरच CBI चौकशी होते का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT