धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे वादात आता करुणा मुंडेंचीही एन्ट्री झाली असून त्यांनी मुंडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप केला आहे.
करुणा मुंडेंच्या या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते.
Maharashtra Politics : मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्यचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह अटकेत असलेल्या दोन आरोपी व माझी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली. तसेच याचा तपास सीबीआयने करावा, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले. या वादात करुणा मुंडे शर्मा यांनी उडी घेत धनंजय मुंडे यांचा कटकारस्थान रचण्याचा धंदाच असल्याचा आरोप केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडे रचू शकतात. जो विरोधात जाईल त्याच्याविरोधात कटकारस्थान रचने हा त्यांचा धंदाच असल्याचे सांगत करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा माध्यमासमोर मांडला. धनंजय मुंडे यांच्यासारखी नासकी वृत्ती मराठवाड्यातूनच नाही तर देशातून बाहेर काढली पाहिजे. त्यांना अमेरिकत पाठवा, तिकडे त्यांनी भरपूर संपत्ती कमावून ठेवली आहे, असा दावाही त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या खळबळजनक आरोपानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करूणा शर्मा यांनी जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाला दुजोरा दिला. जो माणूस आपल्या बायको-मुलांसोबत खालच्या स्तराला जाऊन वागू शकतो, तो कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्याने कट रचला असू शकतो.
मनोज जरांगे पाटील यांची आतील टीम फोडण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केले आहे. पोलिसांच्या कैदेत असलेला आरोपी दादा गरड माझ्याकडे तीन वेळा येऊन गेला आहे. जेव्हा मी जरांगेकडे गेले होते तेव्हा त्याने मला मेसेज केला होता. त्यानंतर लगेच धनंजय मुंडेंना मी जरांगे पाटील यांना भेटल्याची माहिती मिळाली. दादा गरड यांचे मोबाईल तपासा. व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत, मेसेज आहेत. धनंजय मुंडे यांनी त्याला सॉरी म्हणून मेसेज केला होता, असा दावाही करूणा मुंडे यांनी केला.
धनंजय मुंडेंनी त्याला पाच लाख रुपये पाठवले होते. एका गरीब माणसाला धनंजय मुंडे सॉरी का बोलतोय. पाच लाख कशासाठी दिले? हे सर्व पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. मला दुसऱ्या आरोपीचीही रेकॉर्डिंग त्याने ऐकवली होती. त्यांची 1 कोटीची डील सुरु होती, असा गंभीर दावा करुणा मुंडेंनी केला आहे. हे सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत माझी देखील नार्कोटेस्ट करा, अशी मागणी केली.
1. करुणा मुंडेंनी काय वक्तव्य केले?
→ त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर “कटकारस्थान रचणं हा त्यांचा धंदाच आहे” असा आरोप केला.
2. हा वाद नेमका कशावरून सुरू झाला?
→ मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या संघर्षामुळे हा वाद उफाळला.
3. करुणा मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया काय आहे?
→ जरांगे समर्थकांनी या वक्तव्याचे स्वागत केले आहे.
4. बीडमध्ये या वक्तव्याचा काय परिणाम झाला?
→ बीडमध्ये राजकीय चर्चा सुरू असून मुंडे - जरांगे वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5. पुढील घडामोडी काय असू शकतात?
→ या वक्तव्यानंतर जरांगे–मुंडे वाद आणखी वाढू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.