Ncp Ex. Mla Chandrakant Danve, News, Jalna
Ncp Ex. Mla Chandrakant Danve, News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Jalna Political : एका दानवेला चाॅकलेट, दुसऱ्याला टोपी ; नेत्यांच्या वाढदिवसाची वेगळीच तऱ्हा..

तुषार पाटील

Marathwada News : राजकीय नेते, पुढाऱ्यांचे वाढदिवस म्हणजे त्यांच्या समर्थकांसाठी पर्वणीच असते. बॅनरबाजी, सत्कार सोहळे यात समर्थक अगदीच दंगून जातात. गेल्या महिन्यात (Bjp)भाजप आमदार संतोष दानवे यांचा वाढदिवस झाला, तेव्हा त्यांना एका चाहत्याने चक्क चाळीस रुपयांचे चाॅकलेट गिफ्ट म्हणून दिले होते. आता राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना त्यांच्या समर्थकांनी सांताक्लाॅजची टोपी भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत.

एका दानवेंना चाॅकलेट तर दुसऱ्याला टोपी याची चर्चा भोकरदन तालुक्यात सध्या चांगलीच रंगते आहे. माजी आमदार चंद्रकांत दानवे हे आपल्या हसऱ्या चेहऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. (Ncp) कायम चेहऱ्यावर हसरे भाव असल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांची नेहमीच चर्चा असते. तर अशा या दानवेंचा आज वाढदिवस होता. (Jalna) योगायोगाने ख्रिसमस आणि चंद्रकांत दानवे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या एका चाहत्याने शहरभर `अण्णा तुम्ही आमचे सांताक्लाॅज` असे म्हणत बॅनरबाजी केली.

यात चंद्रकांत दानवे यांना सांताक्लाॅज सारखी टोपी देखील घातली. एवढ्यावर हा चाहता थांबला नाही, तर त्याने चंद्रकांत दानवे यांना समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तेव्हा देखील त्यांच्या डोक्यात सांताक्लाॅजची टोपी घातली. तसेच तिथे उपस्थीत सगळ्यांना देखील टोप्या वाटल्या. भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे हे अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या राजकिय कारकीर्दीला अनपेक्षितरित्या सुरुंग लावून संपूर्ण महाराष्ट्रात भोकरदन पॅटर्न प्रसिद्ध केला होता.

सुरुवातीला पोटनिवडणूक व नंतर सलग दोनदा ते भोकरदन तालुक्यातून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांना त्यांनी पराभूत केले होते. तर त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्याकडून ते पराभूत झाले होते. आता आगामी २०२४ च्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून चंद्रकांत दानवे यांच्या समर्थकांनी त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन केले होते.

ख्रिसमसच्या दिवशीच हा वाढदिवस आल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मंगेश जाधव यांनी राजूरमध्ये चंद्रकांत दानवे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. त्यात त्यांना चक्क सांताक्लॉजची टोपी घालून तुम्हीच आमचे सांताक्लाॅज असा उल्लेख करण्यात आला होता. नंतर भोकरदनला देऊन चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क कार्यालयात येवून त्यांना सांताक्लॉजची टोपी घातली.

या अनोख्या शुभेच्छांचा स्वीकार करत चंद्रकांत दानवे देखील भारावले होते. आपण पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आज तुमचा वाढदिवस आणि ख्रिसमस हा एक दुर्मिळ योगायोग आहे. सांताक्लॉजचा चेहरा हा नेहमी हसरा असतो व तुमचा स्वभाव, चेहरा देखील नेहमी हसतमुख असतो. त्यामुळे आमच्यासाठी तुम्हीच आमचे सांताक्लॉज आहात, म्हणून मी तुमच्यासाठी खास ही सांताक्लॉजची टोपी आणल्याचे हा चाहता म्हणाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT