Shivsena News: सत्तारांचा कृषी महोत्सव वादात ; दानवे म्हणाले, अन्नदात्याचे खिसे कापू पाहत आहेत..

Ambadas Danve : शेतकऱ्यांचे कैवारी सरकार म्हणून ढोल बडवणारे आता अन्नदात्यांचेच खिसे कापू पाहत आहे.
Ambadas Danve on Agricultuer Festival News, Aurangabad
Ambadas Danve on Agricultuer Festival News, AurangabadSarkarnama

Agriculture Festival News : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात येत्या १ ते १० जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी महोत्सव होत आहे. (Marathwada) मराठवाड्यातील हा पहिलाच राज्यस्तरीय महोत्सव असल्याने त्याचे कौतुक देखील झाले. परंतु या कृषी महोत्सवासाठी राज्यभरातून पाच कोटी रुपये गोळा करण्याचे उदिष्ट कृषीमंत्र्यांकडून देण्यात आल्याच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Ambadas Danve on Agricultuer Festival News, Aurangabad
Eknath Shinde : सहा पैकी पाच आमदार फोडले, तरी शिंदे म्हणतात आणखी साफसफाई करायचीयं..

कृषी महोत्सवासाठी प्रवेशिका छापण्यात आल्या असून त्यामाध्यमातून ५ ते २५ हजार प्रत्येकी वसुल करण्यात येत असल्याचे बोलले जाते. आता याच मुद्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Abdul Sattar) कृषीमंत्री व शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. (Aurangabad) या कृषी महोत्सवाचा अधिकारी वर्गाच्या डोक्याला ताप झाला आहे, अशा आशयाच्या वृताचा हवाला देत अंबादास दानवे यांनी एक ट्वटि केले असून हे म्हणजे, अन्नदात्यांचेच खिसे कापण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे.

अंबादास दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अधिकारी वर्ग वेठीस धरण्याची सिल्लोडमधील प्रॅक्टिस आता राज्यभर नेण्याचा विडा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उचललेला दिसतो. शेतकऱ्यांचे कैवारी सरकार म्हणून ढोल बडवणारे आता अन्नदात्यांचेच खिसे कापू पाहत आहे. सिल्लोड कृषी प्रदर्शनाच्या प्रवेशिका हजारो रुपयांना विकणे, ही लूट आहे !

दानवे यांच्या या टीकेनंतर आता त्याला अब्दुल सत्तारांकडून प्रत्युत्तर दिले जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सिल्लोड येथील कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी संपुर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. त्यांचे लाडके सुनिल चव्हाण हेच कृषी आयुक्त असल्यामुळे सत्तार त्यांना हवे तसे निर्णय घ्यायला भाग पाडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कृषी महोत्सव यशस्वी झाला पाहिजे, यासाठी जनजागृती आणि बैठकाचा सध्या धडाका सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com