Jalna Political News  Sarkarnama
मराठवाडा

Jalna Political News : अखेर जालना महापालिकेची सरकारकडून घोषणा..

Municipal Corporation : जालन्याचे विद्यमान काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा मात्र महापालिका करण्यास विरोध होता.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : औद्योगिक, सर्वात मोठी स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मोठी बाजार पेठ असलेल्या (Jalna Political News) जालना शहरातील नगर परिषदेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले आहे. या संदर्भातील घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे. जालना महापालिका व्हावी यासाठी माजीमंत्री अर्जून खोतकर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील आग्रही होते.

काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांचा मात्र महापालिका करण्यास विरोध होता. अखेर राज्य सरकारने राज्यातील २९ व्या जालना महापालिकेची घोषणा केली. याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. (Raosaheb Danve) विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता.

त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. (Jalna) औद्योगिक शहर, फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची वाढती लोकसंख्या पाहता जालना महानगरपालिका घोषित करावी, अशी मागणी केली जात होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि माजीमंत्री अर्जून खोतकर हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर जालना महापालिकेसाठी प्रामुख्याने जोरदार प्रयत्न केले गेले.

जालन्याचे विद्यमान काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा मात्र महापालिका करण्यास विरोध होता. सध्या त्यांच्या पत्नी या जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून गोरंट्याल यांनी महापालिका होवू नये, यासाठी प्रयत्न देखील केले होते. मात्र दानवे हे देखील जालना महापालिका व्हावी, या मताचे असल्यामुळे गोरंट्याल यांचा विरोध डावलण्यात आला. अखेर जालना महापालिकेची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT