Hemant Patil Sarkarnama
मराठवाडा

MP Hemant Patil : खासदार हेमंत पाटलांसाठी 'जनआक्रोश'; केली मोठी मागणी

Protest In Nanded : गेल्या आठवड्यात नांदेड रुग्णालयात शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू

Sunil Balasaheb Dhumal

Nanded Political News : नांदेड रुग्णालयातील मृत्युकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणी रुग्णालयाच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आक्रमक होत खासदार हेमंत पाटलांनी डीनला स्वच्छतागृह साफ करण्यास सांगितले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांनी निषेध केला. यानंतर हेमंत पाटलांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Political News)

रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तसेच खासदार हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. नांदेड शहरातील तिरंगा चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण मृत्यू झाले. त्याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण मृत्यू पावले आहेत.

खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालय पाहणीदरम्यान शासकीय रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतेची जाणीव करून दिली. परंतु रुग्णालय प्रशासनाने ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करून खासदार हेमंत पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप जन आक्रोश समितीच्या वतीने करण्यात आला. खासदार पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा, त्याचबरोबर मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात या आठ दिवसांत शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात गेल्या २४ तासांत एका लहान मुलासह ११ रुग्णांचा समावेश असल्याचे समजते आहे. यास रुग्णालयात अद्यापही औषधांचा तुटवडा असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT