Pimpri Chinchwad Police : पिंपरी-चिंचवडचा पोलिस अधिकारी ५० रुपयांत करोडपती !

Dream 11 app : इंग्लंड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यावर बेट लावली
Somnath Zende
Somnath ZendeSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : ऑनलाइन सट्टा तथा जुगारावर पोलिस कारवाई करतात. मात्र, रेसकोर्सवरील घोड्यांच्या शर्यतीसारखा जुगार कायदेशीर आहे. तशाच प्रकारे क्रिकेटसह विविध खेळांवर ड्रीम ११ या मोबाईल गेमिंग अॅपद्धारे जुगारच खेळला जातो. सध्या भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेवरील या खेळात पिंपरी-चिंचवडमधील तरुण पीएसआय सोमनाथ झेंडे याने तब्बल दीड कोटी रुपये जिंकल्याने त्यांचे नशीबच फळफळले आहे. (Latest Political News)

झेंडेने मंगळवारी फक्त ४९ रुपयांची बेटद्वारे दीड कोटी रुपये मिळाले आहेत. इंग्लड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यावर त्याने बेट लावली होती. त्याबद्दल संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला असल्याचे झेंडे याने `सरकारनामा`ला सांगितले. त्याला क्रिकेटची मोठी आवड आहे. हे गेमिंग अॅप कायदेशीर असल्याने खेळतो, असे झेंडे म्हणाले. दरम्यान, या गेमिंग अॅपमुळे हजारो तरुण देशोधडीला लागल्याने त्यावर बंदीची मागणी होत आहे. दुसरीकडे नामवंत खेळाडूंकडून मात्र त्याची जोरदार जाहिरातबाजी सुरूच आहे. न्यायालयात तो कौशल्याचा खेळ असल्याचे सांगून पळवाट शोधण्यात यश आलेले आहे. (Maharashtra Political News)

Somnath Zende
Gram Panchayat Election : मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय! ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवारच मिळेना...

झेंडे हे मूळचे जेजुरीचे रहिवासी आहेत. २०१६ मध्ये ते पीएसआय म्हणून भरती झाले आहेत. सध्या ते पिंपरी-चिंचवड पोलिस कमिशनर हेडक्वॉर्टर येथे ते दंगल नियंत्रण पथकात (आरसीबी) कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या बक्षिसातील ४५ लाख रुपये कर म्हणून कापला जाऊन एक कोटी पाच लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा हाेणार आहेत. त्यापैकी दोन लाख आले असून, 60 हजार टॅक्स जाता एक लाख चाळीस हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मिळणाऱ्या एवढ्या मोठ्या रकमेचे काय करणार अशी विचारणा केली असता, प्रथम घेतलेल्या फ्लॅटचे कर्ज फेडणार आहेत. त्यानंतर मुलांसाठी गुंतवणूक करणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची जोरदार पब्लिसिटी झाल्याने वरिष्ठांकडून झेंडेला आजच विचारणा होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

Somnath Zende
Bhupesh Baghel Candy Crush : कँडी क्रश माझं फेव्हरेट; गेम खेळण्याच्या दाव्यावर बघेलांचं भाजपला बिनधास्त उत्तर...

लॉटरी, मटका, सट्टा, घोड्यांच्या शर्यतीसारखाच ड्रीम इलेव्हन हा काल्पनिक गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. प्रत्यक्षात तो जुगारच आहे. फक्त त्यात तुम्हाला त्या त्या खेळाची आवड, माहिती, कौशल्य जिंकण्यासाठी असणे गरजेचे असते. ऑनलाइन फायनान्शियल ॲपवर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिस दलातील अधिकाऱ्यालाच त्याचा मोह पडल्याचे झेंडेमुळे दिसून आले आहे.

ड्रीम इलेव्हन या मोबाईल अॅपद्वारे कोणत्याही सामन्याआधी आपली आवडती प्लेइंग इलेव्हन निवडायची असते. जितके जण निवडणार त्याच्या आधारे मिळणाऱ्या पॉइंट्सवर पैसे दिले जातात. क्रिकेटसह फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, हॉकी, व्हॉलिबॉल, हँडबॉल आणि बेसबॉल या खेळातही हा खेळ खेळला जातो. त्यात खेळणारा हा त्या-त्या खेळातील खऱ्या खेळाडूंचा एक आभासी संघ तयार करतात.

(Edited by Sunil Dhumal)

Somnath Zende
Lalit Patil News : ड्रगमाफियाची आई म्हणाली, "पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या; ललित-भूषणकडे आम्ही लक्ष देऊनही ते... "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com