Minister Abdul Sattar Awarded
Minister Abdul Sattar Awarded Sarkarnama
मराठवाडा

आखाडा परिषद, संत महंतांकडून अब्दुल सत्तार यांना जननायक पुरस्कार

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा अखिल भारतीय आखाडा परिषद व जिल्ह्यातील देवस्थानांचे संत-महंत यांच्यावतीने जननायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. (Shivsena) अल्पसंख्याक समाजातून आलेले असले तरी सत्तार (Abdul Sattar) हे सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. (Marathwada)

सत्तार यांनी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात शिवस्मारक, भीमपार्क उभारण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला मंजुरी आणि निधी आणत विविध तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठीही पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषद, जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान व शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांना जननायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सिल्लोड येथे शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने यांनी आयोजित केलेल्या मातृपितृ कृतज्ञता सोहळा समारोप प्रसंगी संत महंतांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. आयुष्यात अनेक पदे भूषविली, अनेक ठिकाणी सन्मान झाला, मात्र जननायक या पुरस्कारात साधू संतांचा आशीर्वाद असल्याने हा सन्मान प्रेरणादायी असल्याची भावना सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.

संत महंत यांच्या वतीने देण्यात आलेला जननायक पुरस्कार हा अविस्मरणीय असून या सारखा दुसरा मोठा पूरस्कार नसल्याचे सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुरातन देवस्थानांचा विकास साधण्याचे काम हाती घेतले आहे. भविक भक्तांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

जिल्ह्यासह विविध देवस्थानांना 'ब' व 'अ'दर्जा मिळवून देण्यासह विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील धोत्रा देवस्थानच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी दिला असून जिल्ह्यातील भांगशी माता गड, संत कबीर मठ सावंगी, शिवेश्वर संस्थान वाकी ता. कन्नड, शेलगाव संस्थान, ता. कन्नड, येथे प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मतदारसंघातील मुर्डेश्वर देवस्थान येथे पहिल्या टप्यात १० कोटी रुपये निधी मिळवून देणार असल्याचेही सत्तार यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषद हरिद्वार काशीचे कोषाध्यक्ष १००८ स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, महंत गणेशानंद सरस्वती महाराज जालना, स्वामी स्वात्मानंदपुरी महाराज आळंदी देवाची, सर्वानंद सरस्वती त्रंबकेश्वर, कृष्णबोधानंद महाराज इंदोर, गोपालदास ठाणापती नया उदासीन आखाडा ,स्वामी अवधेशानंद सरस्वती महाराज, स्वामी शिवांनंद सरस्वती महाराज उक्कडगाव,स्वामी योगानंद सरस्वती महाराज पुणे.

रामानंद सरस्वती महाराज त्रंबकेश्वर, ओंकारगिरी महाराज मुरडेश्वर, स्वामी आनंतगिरी महाराज निल्लोड, रामेश्वर महाराज पवार निल्लोड फाटा,संतोष भारती महाराज सारोळा, गणेश महाराज आन्वा, मोरेश्वर महाराज धानोरा, नवनाथ महाराज शिंदे त्र्यंबकेश्वर, पवार महाराज त्रंबकेश्वर, आनंदगिरी महाराज निल्लोड, भोलेश्वर गिरी महाराज जळकी घाट, हावळे महाराज मोढा.

दिगंबर दादा महानुभाव पंथ, शनिउपासक मंगरुळकरशास्त्री,भास्कर गिरी महाराज बोरगाव अर्ज, शनिभक्त सुखदेव महाराज नेवपूर, नामदेव महाराज पल्हाळ वाकी, शांताराम महाराज पेंटर गोळेगाव, बाबुराव महाराज बिडवे, माणिक महाराज शेळके, दिनकर महाराज औटी, मनोज महाराज भाग्यवंत आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT