Baburao Walekar, Manoj Jarange Patil sarkarnama
मराठवाडा

Jalna News : धक्कादायक! अंतरवालीतील त्या दगडफेकीबाबत जरांगेंचे सहकारी वाळेकर यांचा गंभीर आरोप...

Baburao Walekar जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून कोपर्डीतल्या आरोपींवर हल्ला केला होता. त्यानंतर अठरा वर्षे जेलमध्ये जावं लागलं.

सरकारनामा ब्युरो

Jalna News : अंतरवाली सराटीतल्या आंदोलनादरम्यान, दगडफेक करायला मनोज जरांगे आणि राजेश टोपेंनी सांगितलं होतं, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी केलाय. याबाबत वाळेकर यांचा मुंबईतल्या मोर्चापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बाबूराव वाळेकर हे जरांगे पाटलांचे सहकारी आणि कोपर्डीतल्या आरोपींवर हल्ला करणारे चौघांपैकी एक आहेत. त्यांचा याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईला मोर्चा जाण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. सध्या ते जरांगे पाटलांच्या घराशेजारीच राहतात. त्यांनी म्हटलंय की, कुणाच्याही सांगण्यावरून बळी पडू नका. जाळपोळ किंवा दगडफेक करू नका.

त्यांनी व्हिडिओत म्हटलंय की, मी शिवबा संघटनेत १७ ते १८ वर्षे काम करत आहे. अंतरवालीत दगडफेक आणि जाळपोळ करायला जरांगे पाटील आणि राजेश टोपेंनी सांगितलं होतं. त्यांनी पुढे म्हटलंय की, कुणाच्याही सांगण्यावरून बळी पडू नका. जाळपोळ किंवा दगडफेक करू नका.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारण मी जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून कोपर्डीतल्या आरोपींवर हल्ला केला होता. त्यानंतर अठरा वर्षे जेलमध्ये जावं लागलं. करायला लावणारे फक्त बघत असतात, पण भोगावं स्वत:ला लागतं. त्यामुळं कुणाच्याही सांगण्यावरून काही करू नका. कुटुंबाशिवाय कुणीच वाली नसतो, असं वाळेकर यांनी या व्हिडिओत म्हटलंय..

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT