Marathwada Political News  Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार एकत्र येणार का ?

Jagdish Pansare

Marathwada Water Issue : यंदा मराठवाड्यात अत्यंत कमी पाऊस झाला, त्यामुळे जायकवाडीसह छोटी-मोठी धरणे, बंधारे अर्धवट भरली. याचा फटका सिंचन शेतीला बसला, १४ तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यापेक्षा अधिक तालुके होरपळले गेले आहेत. (Jayikwadi Dam News) या पार्श्वभूमीवर नगर, नाशिक या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा मुद्दा परत तापला. मराठवाड्याकडून पाणी सोडण्याची मागणी, तर नगर, नाशिकच्या राजकीय नेत्यांकडून याला विरोध हा नेहमीचाच प्रकार सुरू आहे.

यावर मराठवाड्यातील (Marathwada) लोकप्रतिनिधींकडून जायकवाडीत पाणी सोडावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश मिळाले असून, जायकवाडी कालवा सल्लागार समिती बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. (Farmers) पाण्याचे पहिले आवर्तन सुरू करण्यात आले एकूण २५ दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. १०० क्युसेसप्रमाणे पाणी सोडण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे.

तर दुसरे आवर्तन २० जानेवारी २०२४ रोजी एकूण २५ दिवसांचे असणार आहे. या पाण्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. (Maharashtra) पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेता जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे गोदावरी नदीवरील बॅरेजेसमध्ये व शेतीसाठी पाणी सोडणेबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यांतील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामातील गहू, बाजरी,ज्वारी, तूर, हरभरा, मका, ऊस आदी पिकांसह फळबागांना पाणी देतात, त्यासाठीही मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे पाण्याचा योग्य वापर करावा. १५ ऑक्टोबरमध्ये जी जायकवाडी धरणाची स्थिती असते, त्या स्थितीनुसार वरच्या धरणातून पाणी सोडण्याची तरतूद आहे.

त्यानुसार पाणी सोडण्यात यावे, जायकवाडी धरणाच्या वरील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहांमधून पाणी सोडावे लागते. त्यादृष्टीने पाटबंधारे विकास महामंडळाने निर्णय घेत येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत एकूण ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

परंतु अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांतून ०.५ टीएमसी (५०० द.ल. घ.फू.) ,आळंदी, कडवा, भाम, भावली, बाकी, दारणा, मुकणे व वालदेवी या धरणांतून २.६४३ टीएमसी, तर अहमदनगर जिल्ह्यातील मांडओहोळ, मुळा : २.१० टीएमसी, भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर ३.३६ टीएमसी इतके पाणी सोडावे लागणार आहे.

वरील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे ८.६०३ टीएमसी पाणी सोडणेबाबत लढा उभारून पाणी सोडण्यास भाग पाडण्यासाठी तसेच जायकवाडी डावा कालवा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना उर्वरित ३ ते ४ आवर्तन मिळून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठवाडा पाणी प्रश्नांवर मराठवाड्यातील सर्व आमदारांनी एकत्रित आग्रही भूमिका घेऊन प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT