Jayakwadi Dam Water  Sarkarnama
मराठवाडा

Jayakwadi Water Issue: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जायकवाडीला उत्तर महाराष्ट्रातील धरणातून पाणी सोडलं जाणार

Ganesh Thombare

Delhi News: गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी चांगलंच राजकारण तापलं होतं. मराठवाड्याला नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, तर दुसरीकडे जायकवाडीला पाणी देण्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवला होता.

पण आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आता उत्तर महाराष्ट्रातील धरणामधून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठवाड्याची तहान भागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला होता. उत्तर महाराष्ट्रातील धरणामधून जायकवाडीला पाणी न देण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठरावदेखील मंजूर केला होता. मात्र, नंतर हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला.

या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता 8.5 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीला सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, यावर आता राजकीय नेते काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT