Ashutosh Kale : जायकवाडी पाणीप्रश्नी नेत्यांनी एकत्र यावं; आशुतोष काळेंचे आवाहन

Jayakwadi Dam News : न्यायालयीन लढाईबरोबरच नेत्यांनी एकत्र यावं
Ashutosh kale
Ashutosh kale Sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मराठवाड्यासाठी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरून जायकवाडीला कायद्यानुसार सोडाव्या लागणाऱ्या पाण्याच्या विषयावरून सध्या नगर-नाशिक विरुद्ध मराठवाड्यातील नेत्यांत धुमश्चक्री सुरू आहे.

आरोप-प्रत्यारोप दोन्ही बाजूने होत असले तरी रस्त्यावरील लढाईत मराठवाड्यातील नेते जनतेसोबत रस्त्यांवर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आता जायकवाडीबाबत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी न्यायालयीन लढाईबरोबरच नेत्यांनी एकत्र येऊन आपली बाजू आणि दबाव वाढवणे गरजेचे आहे, यावर भर दिला आहे.

Ashutosh kale
Maratha Reservation News : रावसाहेब दानवेंच्या भावाला मराठा आंदोलकांनी बैठकीतून हाकलले...

'सरकारनामा'शी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या जायकवाडी प्रश्नी वेगवेगळ्या भूमिकांवर थेट बोलणे टाळले. नगर-नाशिक जिल्ह्यांतील अनेक नेत्यांशी सामान्यांना पाणीवाटप धोरणाबाबत पुनर्विचाराबाबत आपण जायकवाडी पाणी न सोडण्यासाठी एकत्र येण्यासाठी आग्रही असल्याचे काळे यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यातील नेत्यांत कुठल्या धरणातून पाणी सोडल्यास आपल्या भागावर परिणाम होईल, या अनुषंगाने भूमिका घेतल्याचे काही दिवसांत दिसून आले आहे. जायकवाडीतील जाणाऱ्या पाण्याबाबत विरोध करताना मुळा धरणातून 2 टीएमसी सोडले जाणारे पाणी निळवंडे धरणातून सोडावे, अशी भूमिका नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी रास्ता रोको करताना मांडली. अशाच वेगवेगळ्या भूमिका ही स्थानिक परिस्थिती पाहून नेते मंडळी कुठेतरी मांडताना दिसत आहेत. आता नेत्यांनी एकत्र यावे, यासाठी काही दिवसांपासून आमदार काळे प्रयत्न करत आहेत.

नगर-नाशिकच्या अनेक धरणातून जाणारे पाणी जायकवाडी धरणात जाणार असल्याने मराठवाड्यातील नेते मंडळी एकत्रित येत दबाव वाढवत आहेत. नगर-नाशिकच्या नेत्यांवर तिखट शब्दांत टीका केली जात असताना नागरिक रस्त्यांवर, जलसंपदा-पाटबंधारे कार्यालयात आक्रमक आंदोलने करत आहेत. या उलट चित्र नगर जिल्ह्यात असल्याने कुठे तरी आशुतोष काळे यांनी न्यायालयीन लढाईसोबतच नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे वाटत आहे.

Ashutosh kale
Shinde Vs Thackeray News : शिवाजी पार्क राडा प्रकरण : केवळ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com