Beed News : आगामी काळात राज्यातील मुदत संपलेल्या नऊ जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. विशेषतः महायुतीमधील भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळेच इच्छुकांनी त्यांच्या गॉडफादरमार्फत प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच गेल्या सहा वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सध्या नाशिकमार्गे विधान परिषदेची तयारी सुरु केली असल्याची चर्चा बीडमध्ये रंगली आहे.
बीड जिल्ह्यातील मातब्बर ओबीसी नेते, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे नव्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग गेल्या काही दिवसापासून शोधत आहेत. जयदत्त क्षीरसागर यांनी आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या ते भाजपकडून विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी नवा ‘नाशिक मार्ग’ चाचपणी सुरु केली आहे.
माजी मंत्री क्षीरसागर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यानंतर ते काहीकाळ सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन पुतणे रिंगणात उतरल्याने तयांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यावेळेसपासून ते राजकारणापासून काहीसे अलिप्त होते.
गेल्या काही दिवसापासून जयदत्त क्षीरसागर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जयदत्त क्षीरसागर यांनी नाशिकमध्ये महंत सुधीर दास यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून त्यांनी भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचे पुढे आले आहे. क्षीरसागर यांनी आपली भेट घेतल्याच्या वृत्तास स्वत: सुधीर दास यांनीही दुजोरा दिलेला आहे.
यासर्व राजकीय घडामोडीमुळे व प्राप्त माहितीनुसार जयदत्त क्षीरसागर हे भाजपकडून विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक असल्याचे समजते. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर हे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी नाशिकमार्गे विधान परिषदेची तयारी सुरु केली असल्याची चर्चा बीडमध्ये जोरात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.