Nitin Gadkari-prithviraj chavan- shrinivas patil
Nitin Gadkari-prithviraj chavan- shrinivas patilSarkarnama

Gadkari-Chavan-Patil : सत्तेत नसतानाही पृथ्वीराजबाबा अन्‌ श्रीनिवास पाटलांनी करून दाखवलं : गडकरींनी निभावला मैत्रीधर्म!

Satara Political News : पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्या विनंतीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कऱ्हाड येथील उड्डाणपुलासाठी सुमारे १३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Published on

Karad, 07 March : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या कोणत्याही पदावर नाहीत. या दोघांचेही पक्ष सध्या राज्यात किंवा देशात सत्तेवर नाहीत. पण, चव्हाण, पाटील या जोडीने सत्तेत नसतानाही सुमारे १३३ कोटी रुपयांचा निधी मिळविला आहे. तो केवळ वैयक्तिक संबंधांच्या जोरावर. होय पक्षातीत मैत्री जपणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पृथ्वीराजबाबा आणि श्रीनिवास पाटील यांच्या विनंतीला मान देत कऱ्हाडमधील उड्डाणपुलासाठी १३३ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि ते मंजूर झाल्याचे पत्रही त्यांना पाठविले आहे.

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड (Karad) तालुक्यातील उंब्रज येथील वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘सिंगल पिलर’ (पारदर्शक) उड्डाणपुलाला अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या पुलाच्या कामासाठी सुमारे १३३.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली. या पुलासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

उंब्रज ही ३० ते ४० गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहराचे दोन भाग झाले आहेत. चिपळूण-पंढरपूर हा राज्य महामार्गही याच ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. सध्या असलेला अंडरपास अपुरा असून, पावसाळ्यात तेथे पाणी साचते. वाढत्या नागरीकरणामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर, कऱ्हाडच्या (Karad) धर्तीवर उंब्रजलाही सिंगल पिलर पूल असावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती.

पृथ्वीराज चव्हाण यांचे पत्र

स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २४ ऑगस्ट २०२३ पासून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे पत्रव्यवहार आणि दूरध्वनीद्वारे सतत पाठपुरावा केला होता. त्यांनी स्वतः उंब्रजला भेट देऊन पाहणी केली होती. गडकरी यांनी या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे निर्देश दिले होते. या अहवालावर चव्हाण यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर या पुलाला हिरवा कंदील मिळाला. निधी मंजूर झाल्याबद्दल चव्हाण यांनी मंत्री गडकरी यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

Nitin Gadkari-prithviraj chavan- shrinivas patil
Satara ZP President : सातारा झेडपीचा अध्यक्ष 20 मार्चला ठरणार; पण कलेक्टरच्या ‘त्या’ विधानाचीच चर्चा!

श्रीनिवास पाटील यांचाही पाठपुरावा

श्रीनिवास पाटील यांनीही खासदार असताना या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवला होता. उंब्रजमधील शासकीय कार्यालये, बँका, शाळा आणि रुग्णालये यांची व्याप्ती लक्षात घेऊन त्यांनी पारदर्शक उड्डाणपुलाची गरज केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या संपर्क कार्यालयातून कळविल्यानुसार, सातत्याने केलेल्या पत्रव्यवहारामुळे तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन आता १३३ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nitin Gadkari-prithviraj chavan- shrinivas patil
Parbhani ZP : मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, 'ही' जिल्हा परिषद हातातून जाणार; बोर्डीकरांच्या विरोधकांची खेळी

नितीन गडकरींचा सकारात्मक निर्णय

कऱ्हाड आणि उंब्रज दोन्ही ठिकाणी वाहतुकीची समस्या गंभीर होत होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सिंगल पिलर उड्डाणपूल होणे आवश्यक होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि जीवितहानी टाळण्यास मदत होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com