Dhananjay Munde-Jitendra Awhad News Sarkarnama
मराठवाडा

Jitendra Awhad Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा 'सुभा' आव्हाड उद्ध्वस्त करणार का ?

सरकारनामा ब्युरो

Beed Political News : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार गट आता एकमेकांच्याविरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. (NCP Political News) सभा, उत्तर सभा घेत दोघांनीही आपापल्या गटाला राज्यात बळ देण्यासाठी जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. अजित पवार गटाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी मंत्र्यांवर दिल्यानंतर आता शरद पवार गटाने देखील जिल्हा प्रभारी घोषित केले आहेत.

अजित पवारांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे निम्म्या मराठवाड्याची सुभेदारी देत मोठी जबाबदारी टाकली होती. अर्थात बीडचाही त्यात समावेश आहेच. पण याच (Beed News) बीडमध्ये शरद पवारांनी घेतलेल्या स्वाभिमान सभेत धनंजय मुंडे यांचा ` अरे पळकुट्या`, असा जाहीर उल्लेख करत आव्हान देणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावरच बीडचे जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यामुळे मुंडेंच्या सुभेदारीला आव्हाड यांच्या माध्यमातून मोठे आव्हान देण्याची खेळी मोठ्या साहेबांनी केल्याची चर्चा रंगू लागली आहे. (Jitendra Awhad) जितेंद्र आव्हाड हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. बीडच्या सभेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेऊन टीका केली होती. आपणही वंजारी असल्याचा त्यांनी केलेला उल्लेख हा बराच बोलका होता हे त्यांना जिल्हा प्रभारी नेमल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आव्हाड मोठ्या पवारांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले. अजित पवार गटाकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आव्हाड आक्रमकपणे उत्तर देत आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहापैकी चार मतदारसंघात आमदार निवडून आले होते, त्या बीडचे जिल्हा प्रभारीपद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांच्यावर सोपवले. अजित पवारांच्या बंडाला बीडमधील चार पैकी तीन आमदारांची साथ मिळाली होती.

एकमेव आमदार संदीप क्षीरसागर शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी संदीप क्षीरसागर यांच्या साथीला आता आव्हाड देखील असणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देण्यासाठी शरद पवारांनी केलेली खेळी किती यशस्वी होते ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. आव्हाड यांना प्रभारी म्हणून दिलेली जबाबदारी पाहता आगामी काळात जिल्ह्यात मुंडे विरुद्ध आव्हाड असा संघर्ष पहायला मिळू शकतो.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT