Mumbai Political News : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रातील सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेत २ लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. नाफेडकडून ही कांदा खरेदी देखील सुरू झाली आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खेरदीचा निर्णय कधीही झाला नव्हता. केंद्राने तो घेतला त्याबद्दल मी पंतप्रधान मोदीसाहेब, गृहमंत्री अमित शाह, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा खरेदीच्या निर्णयाचे स्वागत केले.
हे करत असतांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या निर्णयावर केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिले. कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांनी राजकारण करू नये, ते केंद्रात कृषिमंत्री असतांना देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला नव्हता. (Eknath Shinde) राज्याच्या इतिहासात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला, त्याचे पवारांनी स्वागत केले पाहिजे. कांदा प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा २ लाख मेट्रीक टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. (Maharashtra) याचा माहीती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन धन्यावाद. गृह व सहकार मंत्री अमित शाह, पीयूष गोयल यांनाही धन्यवाद देतो. काद्यांच्या प्रश्नाववर कालापासून चर्चा सुरू होती.
गोयल, शाह यांच्याशी मी बोललो,अजितदादाही बोलले. फडणवीसांची जपानमधून वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा झाली. धनंजय मुंडेही दिल्लीत गोयल यांना भेटले. आतापर्यंतच्या इतिहासातला नाफेडचा हा मोठा निर्णय आहे. २४१० प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. एवढेच नाही तर एक्स्पोर्टसाठी कंटेनरमध्ये असलेला कांदाही खरेदी केला जाणार आहे. यानंतरही गरज भासली तर आणखी सहकार्य केंद्राकडून देण्याची खात्री शाह यांनी दिली आहे.
नाफेडच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी हे पहिल्यांदा होतयं, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मी राज्याच्या वतीने केंद्रातील सर्व नेत्यांना पुन्हा एकदा धन्यावाद देतो. राज्य, शेतकरी अडचणीत असेल तेव्हा केंद्र मदतीसाठी येते. राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापुर्वी या संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले. गेल्यावेळी जाहीर केलेले ३५० रुपयांचे कांदा अनुदान आपण दिले.
याशिवाय कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल, कांदाचाळी, अनुदान, कोल्ड स्टोरेज, नाशवंत वस्तू टिकल्या पाहिजे यासाठी शासन स्तरावर आपण निर्णय घेत आहोत. महाबॅंक ही संकल्पना आपण राबवतोय. शेतकरी अडचणीत आला की त्याला दिलासा देण्यासाठी ज्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, त्या सरकारकडून केल्या जातील. केंद्राचीही मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अनिल काकोडकरांच्या समितीच्या शिफारशी स्वीकारून १० लाख मेट्रीक टन कांदा साठवण्यासाठी योजना राबवणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
शेतकरी संकटात असतांना केंद्र सरकार कायम मदतीला धावून येत असल्याचा पुनरुच्चार करतांना साखर उद्योग अडचणीत आला तेव्हा देखील आम्ही केंद्राकडे गेलो. तेव्हा १० हजार कोटींचा इन्कमटॅक्स कमी करण्याचा निर्णय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. कांदा प्रश्नावर घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे. आम्ही शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देखील शिंदे यांनी यावेळी दिली. कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीच्या निर्णया संदर्भात देखील आपण पंतप्रधानांना पत्र पाठवून फेरविचार करण्याची विनंती केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.