Kailas Gorantyal Jalna News Sarkarnama
मराठवाडा

Jalna Assembly Constituency : जालनेकरांसाठी मेडिकल काॅलेज आणले, आता विद्यापीठासाठी प्रयत्न

Will try for university in Jalna district now, assurance of Kailas Gorantyal : कोणत्याही शहराची ओळख ही त्या ठिकाणची स्वच्छता यावरून केली जाते. जालनेकरांना स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी अनेक प्रकल्प आणले आहेत.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : जालनेकरांसाठी मेडिकल काॅलेज आणले, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आता त्यापुढे एक पाऊल टाकत जालन्यामध्ये विद्यापीठ आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. कैलास गोरंट्याल यांना काँग्रेसने जालना मतदारसंघातून सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे.

गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा दाखला देत गोरंट्याल मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. केलेल्या कामांची माहिती देतानाच पुढील काळात आपले व्हिजन काय असणार आहे? हे गोरंट्याल (Kailas Gorantyal) प्रकर्षाने सांगत आहेत. जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यात आली आहेत. शासकीय मेडीकल काॅलेज हा त्याचाच एक भाग आहे.

पुढील काळात जालना शहरात विद्यापीठ आणण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असे गोरंट्याल यांनी म्हटले आहे. कोणत्याही शहराची ओळख ही त्या ठिकाणची स्वच्छता यावरून केली जाते. जालनेकरांना स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी अनेक प्रकल्प आणले आहेत.

दररोज संकलित होणाऱ्या शहरातील 105 टन कचऱ्याचा त्रास जनतेला होऊ नये म्हणून कचऱ्यातील प्लॅस्टिक, काच, रेती, माती विघटनासाठीचा 10.24 कोटी रुपये खर्चातून 'बायोमायनिंग' प्रकल्प उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. (Congress) कंत्राटदारी पद्धतीने हा प्रकल्प चालवून कचऱ्यापासून मुक्ती आणि खताची निर्मिती अशा पद्धतीने हा प्रकल्प सुरू झाला‌ आहे.

मतदारसंघाचा विकास करतांना जाती, धर्म आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण शहराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. यासाठी सर्व नागरिकांचा विश्वास व पाठिंबा नेहमीच सोबत होता. तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेहमीच मला सहकार्य केले. आपली साथ अशीच कायम राहू द्या, असे आवाहन कैलास गोरंट्याल करत आहेत.

विरोधकांकडे सांगण्यासारखे काही नसल्याने ते खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत, त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मतदारसंघातील नागरिकांना स्वच्छ पाणी, अखंडीत वीज, रस्ते, आरोग्य या सारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागू नये, हाच माझा कायम प्रयत्न असणार आहे, असेही गोरंट्याल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT