Shivsena UBT Vs BJP : 'मातोश्री'वर आमदार कैलास पाटील यांनी संजय निंबाळकर, रामेश्वर शेटे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून घेत ताकद दाखवून दिली. मात्र, या पक्षप्रवेशानंतर कैलास पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
मातोश्रीवर पक्षप्रवेश घडवून आणणाऱ्या कैलास पाटील यांना त्यांच्या होम ग्राऊंडवरच भाजपने घेरले आहे. कळंब नगर परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच्या सर्व 10 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेळ करणार आहेत. या विषयीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
या नगरसेवकांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला देखील दांडी मारत अवघ्या काही तासांतच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सोलापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे.
कळंब पालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता मिळवता आली नव्हती, मात्र, 9 नगरसेवक निवडून आणत आपली ताकद कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. त्यानंतर एक स्वीकृत नगरसेवक वाढल्याने त्यांची संख्या दहावर गेली होती. मात्र, हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये जात असल्याने आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशीव जिल्ह्यातील नेते संजय प्रकाश निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेटे या दोन बड्या नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी मातोश्रीवर या सगळ्यांनी शिवबंधन बांधून त्यांनी पक्षप्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.