Shivsena News: एकनाथ शिंदेंची विदर्भात मोठी खेळी, दर्यापूर नगरपरिषदेचं राजकारणच फिरवलं; काँग्रेसचे तब्बल 19 नगरसेवक फोडले

Daryapur Nagar Parishad Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपरिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह 19 नगरसेवक फोडण्यात यश आलं आहे.
Daryapur Nagar Parishad Shivsena   .jpg
Daryapur Nagar Parishad Shivsena .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची बाजू वकील कपिल सिब्बल यांनी जोरदारपणे मांडताना दिसून येत आहे. या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना सिब्बल यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या तत्कालीन निर्णयांसह एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, शिंदेंनी विदर्भात एक मोठा डाव टाकला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपरिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह 19 नगरसेवक फोडण्यात यश आलं आहे. यापूर्वीच दर्यापूरचे सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांचा शिवसेनेत प्रवेश यापूर्वीच झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर नगरपरिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या एकूण 19 नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी हा पार पडला.

दर्यापूरच्या राजकारणात काँग्रेससमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. दर्यापूरमधून प्रवेश करणाऱ्यांमध्ये सौ. मंदाकिनी सुधाकरराव भारसाकळे, जुलेखाबाई अब्दुल मजीद घाणीवाले, वंदना विठ्ठलसिंह सोलंकी, मुनिफा बी. अय्युब शाह, हबिब खान असदउल्लाखान, कविता दिलीप गवई, रामेश्वर शंकरराव चव्हाण, रामेश्वर फकिरचंद तांडेकर, रेखाताई दिलीपराव चव्हाण, वर्षा विनोद बोरेकर, समीना परवीन सैय्यद नदीम, शेख नसीब शेख इस्माईल उर्फ वसीम शेख, मंदा दादा इंगळे, अहेमद खाँ सादतखॉ, उद्धव विश्वनाथ नळकांडे, स्नेहा शिवाजी देशमुख, सुनिता संजय चव्हाण, प्रविणा नितीन गावंडे, ईश्वर काशिरामजी बुंदेले आणि रामेश्वर जगन्नाथजी मालपाणी या नगरसेवकांचा समावेश आहे.

Daryapur Nagar Parishad Shivsena   .jpg
Delhi Security Alert: देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच 'राजधानी'त खळबळ; हायकोर्टासह 6 ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर अकोटमधून 2024 ची विधानसभा निवडणूक लढलेले दिपक बोडखे यांनीही त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. ते माजी राज्यमंत्री रामदासजी बोडखे यांचे चिरंजीव असून बारी समाजाचे नेतृत्व करतात.

त्यांच्यासोबत शंकरराव नेमाडे, संजय भावे, दिनेश घोडेस्वार, अनंता रेखाते, संजय तेलगोटे, अतिक शाह, काशीनाथ नेमाडे, महादेव अवंडकार, राजू ढोले, धनराज कहार, गौरव तळोकार, अनिस खान, सौ. अंकिता तांडे, अविअपा कोरपडे, विजय ताडे आणि विशाल आग्रे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यातील अनेक जण माजी नगरसेवक तसेच सेवा सहकारी सोसायट्यांशी संबंधित पदाधिकारी आहेत.यावेळी प्रहारसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

Daryapur Nagar Parishad Shivsena   .jpg
Beed News: पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यापूर्वीच बीडमधून हादरवणारी अपडेट, हत्या झालेल्या विलास घुलेंच्या पत्नीनं विषारी औषध प्राशन केलं

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून शिवकुमार धनाजी बोधने, रोहित संजय पाटील, दिपक प्रकाश बोधने आणि सुदर्शन संजय हेगाजे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटन विस्ताराला आणखी बळ मिळाले आहे.

नागपूरमधील पदाधिकाऱ्यांचीही एन्ट्री

नागपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांशी संबंधित संदीप मेश्राम, सचिन कुंभारें, केतन सहारे, पंकज बोरकर, श्रीकांत रामटेके, भूषण सोमकुंवर, विशाल बोरकर, राम जानकर, अभिषेक घोष, नितीन इंगळे आणि अमित कारसामोरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये जिल्हाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, महासचिव, नगरसेवक, उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com