Kannad APMC News
Kannad APMC News Sarkarnama
मराठवाडा

Kannad APMC Election: पैसे कुणाकडूनही घ्या, मतदान मात्र शेतकऱ्यांच्या पॅनललाच करा, जाधवांचे अजब आवाहन..

सरकारनामा ब्युरो

Harshvardhan Jadhav News: माजी आमदार आणि नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड बाजार समिती (Kannad Market Committee)निवडणुकीच्या मतदारांना एक आवाहन केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तुम्ही पैसे कुणाकडूनही घ्या, पण मतदान मात्र शेतकऱ्यांच्याच पॅनलला करा, असे म्हणतांना दिसत आहेत. विशेषत: ग्रामपंचायत व सोसायटीच्या मतदारांना त्यांनी हे आवाहन केले आहे.

कन्नड बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) हे शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक काम करणारे, त्यांच्या धान्याला योग्य भाव देणारे पॅनल निवडून आणा, असे आवाहन समाज माध्यमांतून वारंवार करतांना दिसले. (Kannad) पैसे खाऊन सत्तेवर येणारे लोक शेतकऱ्यांचे कधीही भलं करू शकत नाही, त्यामुळे प्रामाणिक लोकांच्या हाती बाजार समितीचा कारभार सोपवा, अशी साद देखील त्यांनी वेळोवेळी मतदारांना घातली.

बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. (Marathwada) या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी पैसे घेवून मतदान करू नका असे आवाहन केल्यानंतर काही लोकांचे मला फोन आले. ते म्हणाले, आम्ही पैशासाठी निवडणूक लढतोयं असं तुम्हाला वाटतं का? पण आम्ही देखील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी निवडणुकीत पैसे खर्च केले आहेत, त्यामुळे आमचा नाईलाज होतो.

मी काही अंशी त्यांच्या मताशी सहमत आहे. पण माझे त्यांना एवढेच सांगणे आहे, तुम्हाला कुणाकडून पैसे घ्यायचे ते घ्या, माझ काही म्हणणं नाही. पण मतदान मात्र शेतकऱ्यांच्या पॅनलला करा. कारण हा शेतकरी वर्षभर शेतात राबतो, आपल्या मालाला चांगला भाव मिळेल, त्यातून चार पैसे आले तर आपण त्यातून कुटुंबासाठी काही करू या आशेवर तो जगत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा, मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही, पण शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे, हे डोक्यात ठेवून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्या, आणि चांगले पॅनल निवडून आणा, असे आवाहन देखील जाधव यांनी कले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT