karuna sharma Sarkarnama
मराठवाडा

Karuna Sharma: करुणा शर्मा मुंडे ढसाढसा रडल्या! म्हणाल्या, 'तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं...' VIDEO पाहा

Parli Vidhan Sabha Election: अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा पाठिंबा नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून फॉर्म भरला होता.

Mangesh Mahale

Beed News: करुणा शर्मा यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला आहे. करुणा यांनी परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करीत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी व्हिडीओ शेअर करीत महाराष्ट्रात लोकशाही संपली असल्याचे म्हटलं आहे.

"परळी विधानसभा मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परळी परिसरात सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा पाठिंबा नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून फॉर्म भरला होता.

पण महाराष्ट्रातील लोकशाही संपलेली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच शिल्लक राहिलेली नाही," अशी खदखद करुणा शर्मा यांनी इन्स्टाग्रामवरुन व्यक्त केली आहे.

परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार, मंत्री धनंजय मुंडे हे लढत आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख हे रिंगणात आहे.राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात 40 वर्षांनी पहिल्यांदाच कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे.

करुणा शर्मा आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात...

तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं. एक महिला स्वत:चं अस्तित्व गमावून, पतीचं अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस. याचा इतिहास साक्षी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT