K. Chandrasekhar Rao Rally In Nanded News 
मराठवाडा

K.Chandrasekhar Rao News : शेतकऱ्यांना दहा हजार, मोफत वीज द्या, मी महाराष्ट्रात येणार नाही..

Marathwada : शेतकऱ्यांचे आयुष्य सुखकर बनवण्यासाठीच आम्ही आमच्या पक्षाचा विस्तार देशभरात करण्याचा प्रयत्न करत आहोत.

सरकारनामा ब्युरो

Nanded : मी महाराष्ट्रात राजकारण करण्यासाठी नाही तर शेतकरी आणि दलितांच्या उत्कर्षासाठी येत आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत, चोवीस तास मोफत वीज देण्याची घोषणा करावी, मी इकडे येणार नाही, असे थेट आव्हानच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले. राज्यातील शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून जेव्हा आंदोलन केली जातात, तेव्हा तुमचे लोकप्रतिनिधी कुठे असतात? गुवाहाटीला का? असा टोला देखील केसीआर यांनी शिंदेना लगावला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) यांची लोहाच्या बैलबाजार मैदानात जाहीर सभा झाली. राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला. (Nanded) नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यात दोन सभा घेत केसीआर यांनी महाराराष्ट्रातील राजकीय पक्षांना सूचक इशारा दिला आहे. अनेक माजी आमदार, खासदार व विद्यमान पदाधिकारी बीआरएस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

के. चंद्रशेखर राव यांनी आपण किसानवादासाठी लढा देत आहोत, माझ्या देशातील शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या पीकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, तो जगला पाहिजे यासाठी माझा लढा सुरू आहे. प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरवले तर ते करता येते हे आम्ही दाखवून दिले आहे. आता देशातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुखकर बनवण्यासाठीच आम्ही आमच्या पक्षाचा विस्तार देशभरात करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही महाराष्ट्रात आलो तर आमच्यावर टीका सुरू झाली आहे.

पण ज्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत, त्या इथल्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी दिल्या तर आम्ही महाराष्ट्रात येणार नाही. आम्ही नांदेडमध्ये सभा घेतली आणि इथल्या सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना दहा हजार रुपये, चोवीस तास वीज पुरवली तर आम्ही महाराष्ट्रात येणार नाही, याचा पुनरुच्चार देखील चंद्रशेखर राव यांनी केला. महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद निवडणुका बीआरएस पक्ष लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT