संतोष आटोळे -
Indapur News : राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड असून आगामी काळात याबाबत पुराव्यानिशी पडद्यावर चित्र दाखवून बोलेल आणि सर्व बारामती लोकसभेसह संपूर्ण विधानसभा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी केले.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व युवा वॉरियर्स यांच्या माध्यमातून युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक काटे यांच्या प्रयत्नातून इंदापूर, बारामती व कर्जत जामखेड मतदार संघात 52 शाखाचे उद्घाटन निमित्त इंदापूर येथे आयोजित जाहीर सभेस बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील, विक्रांत पाटील, गणेश भेगडे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. पडळकर म्हणाले, फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन भांडवलदारांना भांडवल देण्याचं काम पवारांनी केलं. त्याचवेळी अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात 40 ते 44 गावांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी देऊ शकले नाहीत असा टोला लगावला. तसेच जर लोकशाही मजबूत करायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा राहण्याचं आवाहन केले.
यावेळी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात भाजप कार्यक्रम चालू आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून शहर विकासासाठी तेरा कोटी रुपये आम्ही आणले आणि विरोधक बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावतात. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे अशी मागणी करत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यासाठी आणलेल्या निधीची माहिती दिली.
कार्यक्रमास 3 तास विलंब, कार्यकर्ते ताटकळले..
दरम्यान, सदर सभेसाठी आयोजकाकडून 5 वाजताची वेळ देण्यात आली होती.मात्र रात्री 8:30 वाजता सभेस सुरवात झाली.याबाबत संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार बावनकुळे यांच्या मार्गात बदल झाल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले.मात्र, यामुळे कार्यकर्त्यांवर ताटकळत बसण्याची वेळ आली.
शाखा उद्घाटनावेळी चोरांनी केला हात साफ
इंदापूर येथील शाखा उद्घाटनप्रसंगी चोरट्यांनी हात साफ केला.यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे यांच्या गळ्यातील 5 तोळे वजनाचे लॉकेट चोरट्यांनी हातोहात लंपास केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.