Beed NCP News Sarkarnama
मराठवाडा

Beed NCP News : खून अन् खंडणी प्रकरणात आरोप होताच चाटेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

Kej Taluka President expelled from NCP-accusation that the party's image is being tarnished-Beed murder-extortion case-Marathwada : घटनेच्या पाच दिवसांनी जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण यांनी विष्णू चाटे याला पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली.

Jagdish Pansare

बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनासह पवनचक्की उभारणीसाठी दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या विष्णू चाटे याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज (NCP)तालुकाध्यक्षपदावरुन अखेर शनिवारी (ता. 14) हकालपट्टी करण्यात आली. खून प्रकरणातील चाटे यांच्या नामोल्लेखाने सर्वच बाजुंनी टीकेची झोड उठल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली.

संतोष देशमुख यांचे सोमवारी (ता. 9) केज जवळून अपहरण करण्यात आले. (Beed News) अपहरणानंतर विष्णू चाटे देशमुख यांच्या भावाच्या संपर्कात होता, तुमच्या भावाला आणून सोडायला लावतो असे तो सांगत होता, असा नातेवाईकांचा दावा आहे. दरम्यान, 26 तासांच्या आंदोलनानंतर विष्णू चाटेचा या अपहरण व खुनाच्या आरोपीत समावेश करण्यात आला.

त्यानंतर अवादा कंपनीच्या पवनचक्की उभारणीसाठी सुदर्शन घुले याला पुढे घालून दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याची फिर्याद कंपनीच्या सुनिल शिंदे यांनी केज पोलिस ठाण्यात दिली. यावरुन धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद झाला. खून, अपहरण व खंडणीसारख्या गंभीर प्रकरणात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे आल्याने सर्वत्र टीका होऊ लागली.

अगदी महायुतीच्या आमदारांकडूनही लक्ष्य केले जाऊ लागल्यानंतर घटनेच्या पाच दिवसांनी जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण यांनी विष्णू चाटे याला पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली. खूनप्रकरणात सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे व विष्णू चाटे यांच्यावर गुन्हा नोंद असून आतापर्यंत पोलिसांनी प्रतिक घुले, जयराम चाटे व महेश केदार या तिघांना अटक केली आहे.

सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे फरार आहेत. बीड जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने विष्णू चाटे यांच्यावर पक्षाने कारवाई केल्याचे हकालपट्टीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी या कारवाईची प्रत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना पाठवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT