NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भाकडे देणार विशेष लक्ष, कार्यकर्त्यांची 'ती' इच्छा होणार पूर्ण

CP DCM Ajit Pawar : अजित पवार हे 40 आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात विदर्भातील कार्यकर्तेसुद्धा आले होते. यावेळी अनेकांना सत्तेत वाटा मिळेल अशी आशा होता.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP News : अजित पवार यांनी महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात विदर्भातील कार्यकर्त्यांना उपेक्षित ठेवले होते. अनेकांनी याबाबत वारंवार नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा महायुतीची सत्ता आली आहे. विदर्भातून दादांचे सहा आमदार निवडूण आले आहेत. त्यामुळे आत्तातरी आमचा विचार करा, अशी भावना विदर्भातील कार्यकर्त्यांची आहे. याबाबत विदर्भाचे समन्वयक राजू जैन यांनीसुद्धा विदर्भातील कार्यकर्त्यांना झुकते माप देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अजित पवार विदर्भाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार हे 40 आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात विदर्भातील कार्यकर्तेसुद्धा आले होते. यावेळी अनेकांना सत्तेत वाटा मिळेल अशी आशा होता. त्यामुळे डीपीसीवर काही सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हा अपवाद वगळता कोणाला काही मिळाले नाही. विदर्भातील एकाही पदाधिकाऱ्याची महामंडळावर नियुक्ती करण्यात आली नव्हती. नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्तपद अडीच वर्षे रिकामे ठेवण्यात आले मात्र कोणालाच नियुक्त करण्यात आले नव्हते.

Ajit Pawar
Beed Crime News : देशमुख खून प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत 'त्या' नेत्याला मंत्रीपद देऊ नये..

लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचा एकही उमेदवार विदर्भातून उभा नव्हता. मात्र, शरद पवार यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. आघाडीचे अमर काळे येथून विजयी झाले. लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने अनेकांना शरद पवार यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.

विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शहर आणि ग्रामीणमध्ये किमान एक मतदारसंघाची मागणी केली होती. त्याकडे लक्ष दिले नाही. काटोल विधानसभा मतदारसंघावरचा हक्कही सोडला. त्याउलट शरद पवार यांनी ग्रामीणधील दोन विधानसभा मतदारसंघ करायम ठेवून अतिरिक्त पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे आणला.

भाजपचा दबाव आणि वर्चस्वामुळे राष्ट्रवादीला नागपूर जिल्ह्यात फारकाही मिळणार नाही, अशी भावनाही निर्माण झाली होती. मात्र विधानसभेच्या निकालाने आता चित्र बदलले आहेत. शरद पवार यांचे विदर्भातील सर्वच उमेदवार पराभूत झाले. अजित पवार यांचे सहा आमदार निवडूण आले आहे. याशिवाय पुन्हा राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा वाढल्या आहेत.

हे लक्षात घेऊन नागपूर शहरात शहर आणि ग्रामीणचे कार्यालय उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रविवारी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालयाचे उद्‍घाटन होणार आहे. यासोबतच कार्यकर्त्यांनासुद्धा महत्त्वाची पदे, महामंडळे देण्याची मागणी केली जात आहे.

Ajit Pawar
Subhash Deshmukh : मला विधानसभा लढवायची नव्हती; सुभाष देशमुखांनी सांगितला निवडणुकीपूर्वीचा घटनाक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com