Chandrakant Khaire- Jadhav Political News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Khaire-Jadhav News : पाठिंबा जाहीर केल्यानंतर खैरे-जाधव पावणेचार वर्षांनी आले एकत्र...

Shivsena : खैरे-जाधव यांच्या या एकत्रित फोटोची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Jagdish Pansare

Marathwada Political : गेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. अपक्ष (Harshvardhan Jadhav) हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल २ लाख ८३ हजार मते घेतल्याने खैरेंचा पराभव होवून एमआयएमचे इम्तियाज जलील हे निवडून आले होते. शिवसेनेसाठी धक्कादायक ठरलेल्या अशा या पराभवाचे शिल्पकार म्हणून ज्या हर्षवर्धन जाधव यांच्याकडे पाहिले जात होते, त्या जाधवांनी आता नवी भूमिका घेत येणाऱ्या लोकसभेसाठी खैरेंना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

सोशल मिडियावार एक व्हिडिओ व्हायरल करत जाधव यांनी खळबळ उडवून दिल्यानंतर २०१९ च्या पराभवानंतर पहिल्यांदाच चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि हर्षवर्धन जाधव हे एकत्र दिसले. कन्नड तालुक्यातील एका गावात असलेल्या शिख धर्मीयांच्या धार्मिकस्थळी खैरे आणि जाधव दोघे एकत्र सहभागी झाले. (Shivsena) यावेळी जाधव यांनी खैरेंना पाठिंबा देण्याबाबतचा पुनरुच्चार देखील केला.

खैरे-जाधव यांच्या या एकत्रित फोटोची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना लोकसभेसाठी आपला पाठिंबा जाहीर केला.

आपण विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, हे सांगतांनाच आता खैरेच पुन्हा खासदार असतील, माझा त्यांना पाठिंबा असेल असेही जाधव यांनी जाहीर केले. यावर खैरे यांनी देखील `चांगली गोष्ट आहे`, असे म्हणत त्यांच्या पाठिंब्याचे स्वागत करणारी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज हे दोघेही एकाच कार्यक्रमात एकत्र दिसल्यामुळे त्यांच्यात खरचं दिलजमाई झाली की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT