Imtiaz Jalil : शरद पवारांच्या बाजूला बसण्याची ताकद ठेवतो, जुने दिवस आता गेले..

Aurangabad : आम्हाला फक्त गल्लीतले नेते करून ठेवले. पण आता आम्हाला गल्लीतला नेता होणे मान्य नाही.
Imtiaz Jalil-Sharad Pawar News, Aurangabad
Imtiaz Jalil-Sharad Pawar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aimim : इम्तियाज जलील हे जातीयवादी पक्षाचे खासदार आहेत, आमचा पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस हा धर्मनिरपेक्ष असल्याचे माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या दोन पक्षांनी फक्त मुस्लिमांची मते घेतली, पण त्यांना कधी सत्तेत सहभागी करून घेतले नाही.

Imtiaz Jalil-Sharad Pawar News, Aurangabad
Congress Vs Ncp : ''राष्ट्रवादी भाजपाची लव्हर..''; काँग्रेस नेत्याचं भरसभेत वादग्रस्त विधान

महापालिका, जिल्हा परिषदेत एक-दोन उमेदवार दिले की झाले ? हीच तुमची धर्मनिरपेक्षता आहे का? पण आम्ही आता मुस्लिम समाजाला जागरूक केले आहे, आज आमची एवढी ताकद आहे की, आम्ही तुमचे जे आका आहेत, शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्या खाली नाही, तर त्यांच्या बाजूला बसण्याची ताकद ठेवतो, अशा शब्दात इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी टोपे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

प्रसार माध्यमांनी या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा, इम्तियाज जलील म्हणाले, राजेश टोपे आणि त्यांच्या पक्षाने मुस्लिमामांचा आमदार, खासदार औरंगाबादेतून निवडून आणला असता तर आम्ही तो पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, असे म्हटले असते. पण केवळ महापालिका, जिल्हा परिषदेत एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधित्व द्यायचे आणि विधानसभा, लोकसभेला स्वतः त्यांचे बाप, नातेवाईक जाणार हे आता चालणार नाही.

मी खासदार म्हणून निवडून आल्यावर आम्ही मुस्लिम समाजामध्ये जागृकता निर्माण केली आहे. मोठ्या पक्षांनी इतकी वर्ष फक्त आपली मते घेतली, सत्ता भोगली आणि आपल्याला मात्र सतरंज्या उचलायला लावल्या. आम्हाला फक्त गल्लीतले नेते करून ठेवले. पण आता आम्हाला गल्लीतला नेता होणे मान्य नाही. आज आम्ही अशी ताकद निर्माण केली आहे, की आम्ही शरद पवारांच्या खाली नाही, तर बाजूला जावून बसू शकतो, याचा पुनरुच्चार देखील इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com