Shivsena UBT News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : खैरे हात जोडून म्हणतात 'जाऊ नका', तर दानवे 'ज्याला जायचे त्यांनी खुशाल जा'!

In Sambhajinagar, Uddhav Sena faces a continuous defection as Khaire suggests not to leave, while Danve states that anyone wanting to leave is free to do so. : महापालिका निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी सत्ताधारी पक्ष बरा,असा विचार या नगरसेवकांनी केलेला दिसतोय. त्यामुळे एकही आमदार नसलेल्या उद्धवसेनेत कोणीही थांबायला तयार नाही.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाहीये. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने छोटे-मोठे धक्के दिल्यानंतर येत्या 22 तारखेला आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी चालवली आहे.

उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आठवडाभरापुर्वी शहरात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात साष्टांग दंडवत घालत कोणीही कुठे जाऊ नका अशी साद घालत हात जोडले होते. तर आता दुसरे नेते अंबादास मात्र ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा, अशी भूमिका घेतली आहे. अशावेळी पक्षातील तळ्यात-मळ्यात असलेल्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी काय करावे? असा प्रश्न पडला आहे.

दानवे यांनी केलेले वक्तव्य हे उद्विगनेतून असले तरी पक्ष फुटत असतांना जिल्हाप्रमुख, आमदार आणि शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, असे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेकडून महापौर पद उपभोगलेल्या बहुतांश जणांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. दहा ते बारा माजी नगरसेवक येत्या 22 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहेत.

खैरे-दानवे या दोन्ही नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. खैरेंनी तर लोटांगण घातले, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. महापालिका निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी सत्ताधारी पक्ष बरा,असा विचार या नगरसेवकांनी केलेला दिसतोय. संजय शिरसाट यांच्या रुपाने जिल्ह्याला मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळाल्याने एकही आमदार नसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणीही थांबायला तयार नाहीत.

संजय शिरसाट यांनी उद्धवसेनेच्या दहा ते बारा माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली आहे. येत्या 22 तारखेला मुहूर्त ठरला असून हे सगळे माजी नगरसेवक मुंबईत शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. ऐन महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्ष रिकामा होण्याची वेळ आली असली तरी अद्याप खैरे-दानवे यांच्यात दिलजमाई झाले नसल्याचे चित्र आहे. या दोघांमधील न संपणारा वाद हे देखील उद्धवसेनेचे वर्चस्व संपण्यामागे एक कारण असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT