Santosh Deshmukh, Krishna Andhale Sarkarnama
मराठवाडा

Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

Krishna Andhale police reward : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, हत्येच्या दिवसापासून कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी फरार असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

Jagdish Patil

Beed News, 22 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला (Walmik Karad) देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, देशमुख यांची हत्या करताना घटनास्थळी उपस्थित असलेला प्रमुख आरोप कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

अशातच आता बीड (Beed) पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळे याला वॉन्टेड घोषित केलं असून शिवाय आरोपी आंधळेची (Krishna Andhale) माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, हत्येच्या दिवसापासून कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी फरार असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही.

त्यामुळेच पोलिसांनी आता त्याची माहिती सांगणार्‍याला बक्षीस जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी ही कोठडी कोर्टाने सुनावली आहे. तर कराडच्या वरिलांनी त्याला स्लीपअॅप्नियासाठी सी पॅप मशीन देण्यासाठी कोर्टाकडे विनंती अर्ज केला आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याची घटना कारणीभूत आहे. या खंडणीचा आणि देशमुख यांच्या हत्येचा थेट संबंध आहे. हत्या प्रकरणातील आरोपीच्या फोनवरुन वाल्मिक कराडने आवादाला खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

अशातच तक्रारीत खंडणी मागितल्याची जी तारीख आहे त्याच तारखेचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे, आणि सुदर्शन घुले यांच्यासोबत वाल्मिक कराड देखील असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कराड या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं सिद्ध झाल्याचा दावा सुरेश धस यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT