Maratha reservation activist Manoj Jarange Patil addressing supporters during the Maratha reservation movement demanding Kunbi certificates for the community. Sarkarnama
मराठवाडा

Cast Certificate : कुणबी प्रमाणपत्राबाबत शिंदे समितीचे मोठे पाऊल; मराठा आरक्षणाबाबतच्या प्रमाणपत्र प्रक्रियेचा समितीकडून आढावा!

Kunbi Certificate Update: मराठा आरक्षणाशी संबंधित कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेचा शिंदे समितीने आढावा घेतला. प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप, आधी वाटप झालेल्या प्रमाण पत्रांची वैधता द्यावी, यासह हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनूसार मराठा-कुणबी प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप करावे, या मागणीसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले आहे.

या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व त्यांच्या समितीने छत्रपती संभाजीनगर येथे मराठा-कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेचा आढावा घेतला. उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ व संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ व पारदर्शकपणे करावी, असे शिंदे यांनी संबंधितांना सांगीतले.

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक झाली. विभागीय आयुक्त कार्यालयातून न्यायमूर्ती शिंदे यांनी बैठकीला मार्गदर्शन केले.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, सहआयुक्त मंजूषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष हजर होते.

बैठकीत उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ पडताळणी, प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती तसेच स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या भूमिकेचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र प्रकरणांची कार्यवाही नियमानुसार करण्याबाबत न्यायमूर्ती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीत शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच ग्राम व तालुका पातळीवरील यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित प्रकरणांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उपलब्ध नोंदींचा प्रभावी वापर करून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT