

PM Modi BookMyShow Event : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 8 सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार असून, त्यानंतर वडोदरा येथे ‘नमो फॉर विकसित भारत’ या विशेष सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या या सार्वजनिक कार्यक्रमासाठी प्रथमच BookMyShow या कमर्शियल ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून नागरिकांना नोंदणीची सुविधा देण्यात आली. कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नाही. म्हणजेच नागरिकांना ही बुकिंग पूर्णपणे मोफत करता आली.
वडोदरा महानगरपालिकेकडून (VMC) कार्यक्रमासाठी डिजिटल पद्धतीने नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. BookMyShow वर बुकिंग सुरू होताच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. न्यूज एजन्सी ANI च्या माहितीनुसार, अवघ्या 1 तासाच्या आत कार्यक्रमातील सर्व जागांचे बुकिंग पूर्ण झाले. त्यानंतर तब्बल 42,000 जणांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.
‘नमो फॉर विकसित भारत’ हा कार्यक्रम महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी पॅव्हेलियनमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांसह विद्यार्थी, व्यावसायिक, शिक्षक, उद्योजक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सिव्हिल सोसायटीमधील व्यक्ती सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमासाठी डिजिटल एंट्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांची बुकिंग कन्फर्म झाली आहे, त्यांना BookMyShow अकाउंटवर इलेक्ट्रॉनिक M-Ticket देण्यात आले आहे. या तिकिटावर Live QR Code असेल. कार्यक्रमस्थळी हा QR Code स्कॅन केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये ₹35,000 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. गुजरात दौरा पूर्ण केल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत ते Global FinTech Fest 2026 चे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.