Latur DCC Bank Election Sarakrnama
मराठवाडा

Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून आमदार रमेश कराड यांची माघार, मुलगा ऋषीकेश मैदानात कायम!

17 candidates withdraw nominations News : विरोधकांच्या वतीने भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरविंद पाटील निलंगेकर व ऋषिकेश कराड यांच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे. त्यांच्या पाठीशी माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व आमदार रमेश कराड यांचा अनुभव असणार आहे.

Jagdish Pansare

BJP-Congress Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दिवसभर जिल्ह्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु त्यांचे चिरंजीव ऋषीकेश कराड हे मात्र निवडणुक मैदानात कायम आहेत. आज एकूण १७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी आपले दोनही अर्ज मागे घेतले आहेत. त्यांचे पूत्र ऋषिकेश कराड मात्र मैदानात उतरले आहेत. तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी रमेश कराड यांनी माघार घेतल्याचे बोलले जाते. ही निवडणूक आता विरोधकांच्या वतीने भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस अरविंद पाटील निलंगेकर व ऋषिकेश कराड यांच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे. त्यांच्या पाठीशी माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व आमदार रमेश कराड यांचा अनुभव असणार आहे.

या निवडणुकीत आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांनी नागरी पतसंस्था व बँक मतदारसंघातून तसेच भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोनही मतदारसंघातून त्यांनी बुधवारी (ता. चार) अर्ज मागे घेतले आहेत. त्यांचे पूत्र ऋषिकेश कराड मात्र मैदानात कायम असणार आहेत. ऋषिकेश कराड हे नागरी पतसंस्था व बँक मतदारसंघातून निवडणूक लढत असून त्यांनी भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

४५ उमेदवारांची माघार

या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याऱ्यांची संख्या ४५ झाली आहे. बुधवारी (ता. ४) नागरी बँक मतदारसंघातून आमदार रमेश कराड, प्रकाश देशमुख, सर्जेराव भांगे, शरद हुडगे, यशवंत बिरादार, भरत गोरे, उदगीर विविध सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून नागोराव वलांडे, मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून सतीश अंबेकर. तर विजय नाडे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून आमदार रमेश कराड, अशोक केंद्रे, ऋषिकेश कराड, ओमप्रकाश नांदगावे, निलंगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ओमप्रकाश बिरादार, अहमदपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून दिनकर जाधव, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून संतोष बेंबडे, भरत गोरे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT