Latur District Bank Election Results 2026 Sarkarnama
मराठवाडा

Latur DCC Bank Election Results : लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा देशमुखांचीच सत्ता; निलंगेकरांच्या पॅनलचा पराभव

Deshmukh Panel Retains Control of Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँक निवडणुकीत पुन्हा देशमुखांची सत्ता आली असून निलंगेकरांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. विजयी उमेदवारांची यादी जाणून घ्या.

Rashmi Mane

Latur District Bank Election Result : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा देशमुख गटाने बाजी मारली आहे. विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी विजय मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत जिल्हा बँक घेतली ताब्यात. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या परिवर्तन पॅनलला मागे टाकले आहे. त्यामुळे लातूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या निकालांमध्ये सहकार पॅनलने आघाडी घेतली होती. त्यानंतरही परिवर्तन पॅनलने काही जागांवर विजय मिळवत लढतीतील चुरस कायम ठेवली.

उपलब्ध निकालांनुसार, सहकार पॅनलने 7 जागांवर विजय मिळवला, तर परिवर्तन पॅनलचे 5 उमेदवार विजयी झाले. या निकालात धीरज देशमुख यांचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. सहकार पॅनलकडून हेमंत जाधव, प्रीती भोसले, आशिष पाटील राजूरकर, संतोष पाटील आणि जगन्नाथ पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

दुसरीकडे, परिवर्तन पॅनलकडून अरविंद पाटील निलंगेकर, अतुल गंभीरे, भगवानराव पाटील तळेगावकर आणि ऋषिकेश कराड यांच्यासह उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणुकीतील आणखी एक लक्षवेधी लढत म्हणजे निलंगेकर कुटुंबातील काकू-पुतण्याची लढत. काँग्रेस नेते अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता निलंगेकर आणि भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर यांच्यात ही लढत झाली. यात अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवला.

SCROLL FOR NEXT