BJP Sarkarnama
मराठवाडा

BJP News : धक्कादायक : भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वीकृत नगरसेवक पदासाठी आधी सोशल मिडियावर चर्चा, नंतर पत्ता कट...

latur municipal corporation controversy : लातूरमधील 70 जागांपैकी काँग्रेस पक्षाने 43 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वंचित बहुजन आघाडीने 4 जागांवर यश मिळवले.

Jagdish Pansare

Latur Municipal Corporation News : लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमतासह सत्ता मिळवली. महापौर, उपमहापौर व महत्त्वाच्या पदावर वर्चस्व मिळाले. तर दुसरीकडे महापालिकेत हिरो ठरण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तेव्हा स्थानिक नेत्यांनी अनेकांना स्वीकृत सदस्य पदाचे गाजर दाखवून शांत केले होते. आता तेच इच्छुक पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

लातूर महापालिकेत एका इच्छुकाचं स्वीकृत सदस्य म्हणून नाव सोशल मिडियावर व्हायरल झालं. त्यामुळे गडी एकद जोशात होता. पण काही तासातच त्याचे नाव कट झाल्याचे लक्षात आले. मग रागाच्या भरात या कार्यकर्त्याने स्थानिक भाजप नेत्यांच्या नावाने बोटं मोडत चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केला. हातात डिझेलची कॅन घेऊन हा इच्छुक ती अंगावर ओतून घेण्याच्या तयारीत असताना उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला रोखले आणि पुढचा अनर्थ टळला.

लातूर महापालिकेत भाजपाने 22 जागा जिंकल्याने दोन स्वीकृत सदस्य त्यांच्या पक्षाला मिळणार आहेत.  त्यानुसार, स्वीकृत नगरसेवकपदाची निवड करण्यात आली. पण, महापालिका निवडणुकीपासून सुरू असलेले भाजपामधील नाराजीनाट्य या निवडीवेळीही उफाळून आले. स्वीकृत नगरसेवक पदासाठी काल प्रदेश पातळीवरून एका नावाची घोषणा पत्राद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली होती.

मात्र, आज अचानक ते नाव रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे लातूरमधील पदाधिकारी संजय गिर यांनी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. नगरसेवक पदासाठी अगोदर नाव झळकले, पण पुन्हा नाव वगळल्याची माहिती मिळताच त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर संजय गिर यांनी संताप व्यक्त करत स्थानिक नेत्यांवर आरोप केले. 'गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. काल स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझे नाव सोशल मीडियावर जाहीर देखील झाले. मात्र, आज अचानक ते नाव वगळण्यात आले. त्यामुळे माझी तीव्र नाराजी आहे', असे त्यांनी स्पष्ट करत पक्षांतर्गत गटबाजीबद्दल संताप व्यक्त केला.

लातूरमधील 70 जागांपैकी काँग्रेस पक्षाने 43 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वंचित बहुजन आघाडीने 4 जागांवर यश मिळवले. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून एकूण 47 जागा त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे महापालिकेवर काँग्रेस-वंचित आघाडीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. येथील महापालिकेत भारतीय जनता पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT