Latur Political News Sarkarnama
मराठवाडा

Latur Political News : मंत्रीमंडळ विस्तारातही लातूरची पाटी कोरीच राहणार..?

Bjp : बावनकुळे लातूरात येवून गेले. तेव्हा त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारात लातूरला निश्चित प्रतिनिधित्व मिळेल, असे संकेत दिले होते.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : लातूर हे मराठवाड्यातील राजकाराणाचे कायम सत्ता केंद्र राहिले आहे. शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजी पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आदी नेत्यांचा राज्याच्या राजकारणात आणि दिल्लीच्या दरबारात कायम दबदबा राहायचा. (Latur Political News) परंतु आता परिस्थिती राहिलेली नाही. राज्याच्या सत्ता स्थापनेत लातूरचा सहभाग असल्याशिवाय हे वर्तुळ पुर्ण व्हायचे नाही.

पण केंद्रात आणि राज्यात २०१४ मध्ये भाजपची (BJP) सत्ता स्थापन झाल्यापासून हे चित्र बदलले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये पहिल्यांदा संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले. फडणवीसांनी त्यांच्यावर कामगार खात्याची जबाबदारी सोपवली होती. लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी त्यांच्याच मंत्रीपदाच्या काळात आली.

२०१९ मध्ये पुन्हा शिवसेना-भाजपची सत्ता राज्यात आली. फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे दिसत असतांना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आणि राज्याच्या राजकारणात काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी सत्तेवर आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रीमंडळात (Amit Deshmukh) अमित देशमुख यांना मंत्रीपद मिळाले.

अडीच वर्षाच्या आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणासह जिल्ह्याचे पालकमंत्री पदही होते. पुन्हा राज्यात राजकीय भूकंप झाला, शिवेसेनेत बंड होवून ४० आमदार भाजपला जावून मिळाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. पहिल्या मंत्रीमंडळात दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र यावेळची राजकीय परिस्थिती आणि कराव्या लागणाऱ्या तडजोडीमुळे लातूरकडे दुर्लक्ष केले गेले. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लातूरात येवून गेले. तेव्हा त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारात लातूरला निश्चित प्रतिनिधित्व मिळेल, असे संकेत दिले होते.

त्यामुळे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पवार-निलंगेकर हे दोघेही फडणवीसांचे आवडते विद्यार्थी, पण नेमकं या दोघांचेच एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे लातूरला मंत्रीमंडळात संधी मिळाली तरी ती निलंगेकरांना की पवारांना? अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. पण राष्ट्रवादीच्या सरकारमधील सहभागाने आता ती देखील थांबली आहे. रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारातही लातूरला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता नसल्याने निलंगकेर, पवार समर्थकांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT