Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Latur : ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करता, नगरपालिका, जिल्हा परिषदेत बघू ; काकाचे पुतण्याला आव्हान..

Grampanchayat : आमदार निधीमधून दापका ग्रामपंचायतीला कधी मदत केली? केली असेल तर ते जाहीर सांगावे.

राम काळगे

Marathwada Political : निलंगा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायत निवणुकीत काँग्रेस ४१ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात आठ व देवणी तालुक्यातील सहा ग्रामपंचायती यश संपादन केले आहे. (Grampanchayat) ग्रामपंचायत कोणाची याबाबत सध्या विविध राजकीय पक्षाकडून श्रेय घेणे सुरू असले तरी मी जाहीर आव्हान देतो कि, घोडामैदान दूर नाही येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या किती जागा? हे बघू अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी पुतणे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना सुनावले.

महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Congress) काँग्रेस, राष्ट्रवादी, व शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अनेक ठिकाणी विजय संपादन केला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामपंचायती निकालाबाबत खोटे दावे केले जात आहेत. (Latur) आमच्या पक्षाच्या वतीने जे पॅनल प्रमुख म्हणून जबाबदारी घेऊन गावामध्ये समविचारी जनतेला सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी धर्मनिरपेक्ष विचार घेऊन लढले. त्यामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.

या करिता मी स्वतः लक्ष देऊन निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे हमीपत्र आपल्या समोर ठेवत आहे. खरं पहिले तर ग्रामपंचायतीची निवडणूक हि पक्षाच्या चिन्हावरती लढवली जात नाही, तरीही महाराष्ट्रात व आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात जे काही दावे-प्रतिदावे करत आहेत ते चुकीचे आहेत. जर त्यांना पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची असेल तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत बघू. शहरालगत असलेल्या दापका ग्रामपंचायत निवडणुकीत धनशक्ती व दडपशाहीच्या जोरावर जातीय मतभेद करून बाहेरील गुंडशाहीचा वापर केला.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. हे जगजाहीर आहे जनतेने हे पहिले आहे, खरे सांगायचे तर निवडणुकीनंतर सगळे काही विसरून पक्ष न पाहता विकासकामे केली पाहिजेत. मात्र विद्यमान आमदार काॅंग्रेस पक्षाच्या विचाराच्या ग्रामपंचायतींकडे दुर्लक्ष करत असाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागरी सुविधा देण्याऐवजी पक्षीय राजकारण करतात. त्यांनी आमदार निधीमधून दापका ग्रामपंचायतीला कधी मदत केली? केली असेल तर ते जाहीर सांगावे. अशा पक्षपाती राजकारणाला दापक्याच्या जनतेने काल झालेल निवडणुकीत स्पष्टपणे झिडकारले आहे.

मी कधीच ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराला जात नसतो, मात्र वरोधकांनी अफवा पसरविल्यामुळे मला जावे लागले. अशीच काही परिस्थिती निलंगा शहरामध्ये बघावयास मिळते. अनेक खोटे आश्वासन देऊन खोट्या गप्पा मारतात त्यांना जनतेने ओळखले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कांग्रेस महाविकास आघाडी आपली ताकद दाखवून देईल. निलंगा तालुका हा सतत कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे, हे ग्रामपंचायत निवडणुकीवरुन दिसून आले आहे.

बऱ्याच ठिकाणी भाजपा पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली असून मतदार संघात २९ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस नंबर एक आहे. यापुढे तालुक्यातील औसा मतदार संघात असलेल्या ६४ गावाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या भागातील कार्यकर्त्यांना पक्ष मजबुती बरोबरच गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आदरणीय दादासाहेबाच्या विकासाचा वारसा घेऊन लवकरच विधानसभा मतदार संघात भारत जोडोच्या धरतीवर निलंगा विधानसभा मतदार संघात विकास यात्रा काढणार असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT